Crime News : रविवार पेठेत गॅस सिलेंडरच्या स्फोटात खानावळ भस्मसात

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील रविवार पेठ परिसरात गवळीवाड्यात असलेल्या एका खानावळीत मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास भीषण आग लागली.या आगीमध्ये खानावळीत असलेला एका गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला.यामध्ये खानावळीत असलेले बहुतांश साहित्य आगीत भस्मसात झाले.आज सकाळी सातच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले.अग्निशमन दलाच्या जवानांनी या खानावळीतून चार गॅस सिलेंडर आणि चार तेलाचे डबे बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.दरम्यान सुरुवातीला प्रचंड मोठ्या प्रमाणात आग लागल्याने खानावळीत असणारे इतर साहित्य मात्र आगीत जळाले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत अवघ्या काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला. अन्यथा आगेची झळ वरच्या मजल्यावर असणाऱ्या कुटुंबीयांना बसत होती.परंतु आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच इमारतीत राहणारे इतर कुटुंबीय वेळीच खाली उतरल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.