Chinchwad News : चिंचवडगाव येथील मोरया हॉस्पिटलच्या मागील ट्रान्सफॉर्मरच्या केबलला आग

एमपीसी न्यूज – चिंचवडगाव येथील मोरया हॉस्पीटलच्या मागील बाजूस असलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या केबलला आग मंगळवारी सकाळी लागली होती.यामध्ये कुणीही जखमी झाले नाही व वित्तहानी झालेली नाही.

चिंचवड विभागाचे पोलीस नागरिक मित्र राकेश सायकर यांनी या आगीबाबत अग्निशमन विभागाला कळवले होते. ते म्हणाले की, “मी मोरया हॉस्पीटलच्या मागे राहतो.आज सकाळी 6 च्या सुमारास खूप मोठे आवाज येऊ लागले जसे सुतळी बॉम्बसारखे फटाके फुटत आहेत.त्यामुळे मी बाहेर आलो व त्यावेळी आगीचे स्पार्क उडत होते. त्यामुळे मोठी आग निर्माण होऊ नये व मोठी हानी टाळण्यासाठी लगेच अग्निशमन विभागाला कळवले.10 व्या. मिनिटाला लगेच एक अग्निशमन बंब तेथे पोहोचला होता. तसेच मी महावितरणच्या अधिकाऱ्यांना पण कळवले होते.”

एका महावितरणच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ट्रान्सफॉर्मरच्या केबलला किरकोळ आग लागली होती.आग विझविण्यासाठी 15 मिनिट परिसरातील विद्युत पुरवठा खंडित केला होता.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाने सांगितले की, सकाळी 6.07 वा चिंचवडगाव येथील मोरे हॉस्पिटलजवळ आग लागल्याचे एका नागरिकांने कळवले.त्यामुळे एक अग्निशमन बंब तेथे पोहचून त्याच्या मदतीने आग विझवण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.