Crime News : इन्स्टाग्रामवर ओळखीतून 36 वर्षीय महिलेवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार

एमपीसी न्यूज – सोशल मीडियाच्या वापराचे दुष्परिणाम रोज समोर येत आहेत.पुण्यातील हडपसर परिसरातून देखील असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. इंस्टाग्राम या सोशल मीडिया साइटवर ओळख झाल्यानंतर एका छत्तीस वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला.

हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनिकेत वासुदेव राठोड (वय २८) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.याबाबत पीडित महिलेने तक्रार दिली आहे. हा प्रकार 2019 ते 2022 या कालावधीत घडला आहे.

तक्रारदार पिडीतेची व संशयित आरोपी अनिकेत यांची इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यातून त्याने लग्न करण्याचे आमिष दाखविले व जवळीक निर्माण केली.त्यानंतर पतीला दोघांमधील संबंधाची माहिती सांगण्याची धमकी देऊन त्यांच्यावर वारंवार बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.