Pavana Dam Update: पवना धरण परिसरात पावसाची विश्रांती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकर आणि मावळवासीयांची तहान (Pavana Dam Update)भागविणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाने चांगलीच विश्रांती घेतली आहे. गेल्या 24 तासात केवळ 8 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा 95.26 टक्यांवर गेला आहे. त्यामुळे वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.

पवना धरणातून पिंपरी-चिंचवड, मावळातील गावांना, शेतीला पाणीपुरवठा केला जातो. या भागासाठी पाणी पुरवठ्याचा पवना धरण मुख्य स्त्रोत आहे.

Hadapsar : पती आणि सासू-सासऱ्यांकडून महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ

पवना धरणाचे काम सन 1972 साली पूर्ण झाले आहे. महापालिका पवना नदीतून रावेत येथील बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो.

धरणातील पाण्याची परिस्थिती!

  • गेल्या 24 तासात झालेला पाऊस – 8 मिली मीटर
  •  1 जूनपासून झालेला एकूण पाऊस – 2041 मिली मीटर
  • गेल्यावर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस – 1980 मिली मीटर
  •  धरणातील सध्याचा पाणी साठा – 95.26 टक्के
  •  गेल्यावर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा – 97.17 टक्के
  •  गेल्या 24 तासात पाणी साठ्यात झालेली वाढ – 0 टक्के
  •  1 जूनपासून पाणी साठ्यात झालेली वाढ – 77.40 टक्के

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.