Talegaon Dabhade : आदर्श विद्या मंदिर संकुलात भूमिगत पाण्याच्या टाकीचे हस्तांतरण व वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचलित आदर्श विद्यामंदिर संकुलात (Talegaon Dabhade) पोस्को इंडिया लिमिटेड कंपनीच्या सीएसआर फंडातून व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या सहकार्यातून दहा हजार लिटर क्षमतेची भूमिगत पाण्याची टाकी बांधण्यात आली. या टाकीचा हस्तांतरण समारंभ शुक्रवारी (दि. 11) पार पडला. यावेळी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

सदर कार्यक्रमास पोस्को कंपनीचे पदाधिकारी जॉन सो., संतोष देशमुख, अमोल बुडखुले,सोनू कुमार, नेहा वाकचौरे,पृथ्वीराज देसाई,रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांचे पदाधिकारी उद्धव चितळे (अध्यक्ष- रोटरी क्लब),कमलेश कार्ले (उपाध्यक्ष- रोटरी क्लब),श्रीशैल मेंथे (सचिव-रोटरी क्लब) तसेच महेश महाजन,राजीव गोडबोले, प्रसाद मुंगी,राजन आम्रे , ऋषिकेश कुलकर्णी, मंगेश गारोळे, भालचंद्र लेले,विकास उभे,नितीन फकटकर, प्रमोद दाभाडे, अर्चना चितळे व इतर सदस्य उपस्थित होते.

मावळ शिक्षण प्रतिष्ठान संस्थेचे सहसचिव वसंत पवार,आदर्श विद्या मंदिर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष खामकर, आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संजय देवकर, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीहरी मिसाळ, प्रकाश शिंदे तसेच सर्व (Talegaon Dabhade) शिक्षकवृंद व शिक्षकेतर बांधव उपस्थित होते.

Pavana Dam Update: पवना धरण परिसरात पावसाची विश्रांती

सदर कार्यक्रमात प्रथम पोस्को कंपनीचे सर्व पदाधिकारी व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सर्व पदाधिकाऱ्यांचा त्यांच्या सहकार्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

संस्थेचे सचिव यादवेंद्र खळदे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा पाठविल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किसन पाटील यांनी केले. प्रा. वसंत पवार यांनी आभार मानले. वृक्षारोपणाने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.