Hadapsar : पती आणि सासू-सासऱ्यांकडून महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ

एमपीसी न्यूज : पतीकडून शारीरिक तसेच सासरच्यांकडून (Hadapsar) मानसिक छळ प्रकरणी हडपसर येथील विवाहितेने आपल्या पती, सासू, सासरे तसेच दोन चुलत सासरे यांच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी पती प्रीतम राजकुमार शिंदे, सासरे राजकुमार विष्णु शिंदे, सासू तसेच शंकरराव आणि रोहिदास शिंदे या दोन चुलत सासऱ्यांविरोधात भा. द. वि कलम 498(अ)34, 377 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alandi : ‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करण्यासाठी आळंदीकरांनी पुढाकार घ्यावा – कैलास केंद्रे

हा छळ 2021 पासून आतापर्यंत फिर्यादीच्या राहत्या घरी चालू होता. (Hadapsar)फिर्यादी यांच्या पतीने लग्न झाल्यापासून वेळोवेळी अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले असून सासू व इतरांनी वेगवेगळ्या कारणाने शारीरिक तसेच मानसिक छळ करत नांदू दिले नसल्याची तक्रार फिर्यादी महिलेने केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.