PCMC :  महापालिका देणार 18 लाखांचा सशस्रसेना ध्वज निधी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (PCMC ) अधिकारी व कर्मचारी 18 लाख रुपयांचा सशस्रसेना ध्वज निधी देणार आहेत.  त्यात आयुक्त 2 हजार रुपये, वर्ग एकचे अधिकारी 1 हजार रुपये देणार आहेत.

जिल्हा सैनिक कल्‍याण कार्यालयाकडून सशस्रसेना ध्वजदिन निधी उभारला जातो. देशाच्या संरक्षणासाठी हुतात्मा झालेल्या जवानांच्या वीर पत्नी, वीर माता किंवा वीर पिता, दिव्यांग सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व त्यांच्या कल्याणकारी योजनांसाठी या निधीचा वापर केला जातो. त्यासाठी महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळून 18 लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे.

Charholi : बेकरी टाकण्याच्या बहाण्याने महिलेची सव्वा तीन लाखांची फसवणूक

त्यात आयुक्त 2 हजार रुपये, वर्ग एकचे अधिकारी 1 हजार रुपये, मुख्याध्यापकांसह वर्ग दोनचे अधिकारी 500 रुपये, शिक्षकांसह वर्ग तीनचे कर्मचारी 200 रुपये आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी 100 रुपये देणार आहेत. त्यांच्या जूनच्या पगारातून ही रक्कम कपात केली जाणार असल्याचे प्रशासन विभागाने परिपत्रकात (PCMC ) म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.