PCMC : पाण्याची नासाडी केल्यास कारवाई; श्रीकांत सवणे यांचा इशारा

एमपीसी न्यूज – वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढल्याने(PCMC)  पाण्याचा अपव्यय होऊ नये, यासाठी पिण्याच्या पाण्याचा गैरवापर केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी दिला आहे.

शहरामध्ये गेल्या साडेतीन वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. पवना धरणातील पाणीपातळी सातत्याने घटत आहे. धरणात सध्या 40 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातच पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.  पाण्याची नासाडी होता असल्याचा तक्रारी पालिकेकडे येत आहेत.

Pune : जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर लैंगिक अत्याचार

तसेच प्रत्येक जनसंवादमध्ये पाण्याच्या तक्रारी सातत्याने वाढत आहे. या तक्रारींची दखल घेऊन पिण्याच्या पाण्याची नासाडी करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी, असे आदेश सहशहर अभियंता सवणे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले (PCMC) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.