Chikhali : लाभार्थ्यांनो, सदनिका भाड्याने देऊ नका – उल्हास जगताप

एमपीसी न्यूज – घरकुलच्या माध्यमातुन नागरीकांचे घराचे (Chikhali) स्वप्न साकार होत असून त्याचा उपयोग योग्य पद्धतीने करावा. आपल्या परिसरात स्वच्छता ठेवावी व मिळालेली सदनिका विक्री अथवा भाड्याने देऊ नये, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.

केंद्र व राज्य शासनाचे सहकार्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्राधिकरण सेक्टर क्र. 17 व 19 चिखली येथे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातील 6 सोसायट्यांच्या इमारती मधील एकुण 252 लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात काढण्यात आली. सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम, प्रशासन अधिकारी दशरथ कांबळे, कनिष्ठ अभियंता शरद मोरमारे, कार्यालय अधिक्षक विष्णु भाट, कॉम्प्युटर ऑपरेटर सुनिता चौगुले पाटील, लिपिक योगिता जाधव यांच्यासह झोनिपु विभागातील सर्व अधिकारी / कर्मचारी तसेच लाभार्थीसह सर्व उपस्थित होते.

Savarkar Gaurav Yatra : पिंपरी विधानसभा क्षेत्रात रविवारी निघणार वीर सावरकर गौरव यात्रा

यावेळी नियोजित घरकुल सहकारी गृहरचना संस्थासाठी तात्पुरत्या स्वरुपात निवड करण्यात आलेल्या सोसायटी क्र. 148 इमारत क्र. एफ-13, सोसायटी क्र. 149 इमारत क्र. एफ -17, सोसायटी क्र. 150 इमारत क्र. डी- 8, सोसायटी क्र. 151 इमारत क्र. डी-12, सोसायटी क्र. 152 इमारत क्र. एफ-14, (Chikhali) सोसायटी क्र. 153 इमारत क्र. एफ-18 या सर्व सोसायटी अध्यक्ष यांचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी लाभार्थींनी आता हक्काचे व स्वत:चे घर मिळाल्याने इमारतीमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण करावे, घराचा वापर स्वत: करावा, परिसर स्वच्छ ठेवावा, इमारती भोवती झाडे लावून त्याचे योग्य प्रकारे निगा राखावी व जतन करावे असे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप म्हणाले. (Chikhali) यावेळी सुषमा शिंदे यांनी प्रकल्पाची माहिती, घराचा वापर, येणारे देयके व बँकेचे हप्ते वेळेवर भरणेबाबत मार्गदर्शन केले. कार्यालय अधिक्षक विष्णु भाट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.