Pimpri News : पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने अर्थसंकल्पात पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यावर भर दिला आहे. तसेच, भाजपाच्या सत्ताकाळात  प्रस्तावित केलेल्या प्रकल्पांना गती दिली आहे. (Pimpri News) खऱ्या अर्थाने पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आगामी2023-24 या आर्थिक वर्षाचा मूळ 5 हजार 298 कोटी आणि केंद्र, राज्य शासनाच्या योजनांसह  एकूण 7 हजार 127 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात सर्वस्तरातील नागरिकांचा विचार करण्यात आला आहे. त्याबद्दल आमदार लांडगे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Pune News : खोदकामामुळे वारजे परिसरातील वीजवाहिन्यांचे नुकसान

आमदार लांडगे म्हणाले की, 2017 ते 2022 या पाच वर्षांच्या भाजपा सत्ताकाळात कोविड महामारीत शहरातील विकासकामांवर परिणाम झाला होता. मात्र, भाजपाच्या माध्यमातून अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले. दरम्यान, 2019 मध्ये राज्यातील सत्ताबदल झाला होता. (Pimpri News) त्यामुळे अडीच वर्षे भाजपा काळातील विकासकामांना गती मिळाली नाही. याउलट, अनेक कामांची तरतूद कमी करुन राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न झाला होता.

मात्र, शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात प्रशासक राजवट असतानाही भाजपा सत्ताकाळातील कामांना चालना मिळाली. आयुक्त शेखर सिंह आणि प्रशासनाने सामान्य पिंपरी-चिंचवडकर केंद्रबिंदू मानून अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, रस्ते, पर्यावरण, शिक्षण, क्रीडा आणि महिला सक्षमीकरणासह प्रस्तावित प्रकल्पांना पूर्ण करण्याचा संकल्प प्रशासनाने केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.