Pimpri : पालिका आयुक्त एक रुपयाही खात नाहीत; सभागृह नेत्यांचा दावा 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेला श्रावण हर्डीकर यांच्या रुपाने चांगले आयुक्त मिळाले आहेत. ते अतिशय हुशार असून चांगले काम करत आहेत. हर्डीकर एक रुपया देखील खात नाहीत, असा दावा सभागृह नेते एकनाथ पवार यांनी केला. 

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आज (बुधवारी) झालेल्या महासभेत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीच्या शहर सल्लागार समितीची 31 ऑगस्ट रोजी खासदार, आमदार, पालिकेतील प्रतिनिधींच्या उपस्थित झालेल्या बैठकीत विरोधी पक्षनेते आणि आयुक्त यांच्यात झालेल्या खडाजंगीवर चर्चा झाली.

 

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर म्हणाले, आयुक्त शहराचे असतात. त्यांच्या वक्तव्यातून नगरसेवकांचा निषेध होत असेल तर मी आयुक्तांचा निषेध करतो. आयुक्तांनी नगरसेवकांचा अनादर करणे चुकीचे आहे. असे केल्यास काळ कदाफी माफ करणार नाही. दत्ता साने हे केवळ नगरसेवक नसून सभागृहाचे विरोधी पक्षनेते आहेत. 38 नगरसेवकांचे नेते आहेत. त्यांचा अवमान म्हणजे सभागृहाचा अवमान आहे. त्यामुळे अधिका-यांनी त्यांचा मानसन्मान ठेवणे अपेक्षित आहे. घडलेला सर्व प्रकार निषेधार्ह असून याचा सर्वपक्षिय नगरसेवकांनी निषेध केला पाहिजे. यामध्ये पक्ष आणता कामा नये. आजही वेळ साने यांच्यावर आली आहे. उद्या दुस-यावर कोणावर येईल. त्यामुळे याला सभागृहाच्या नेत्याने अनुमोदन देऊन निषेध करावा.

 

सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, स्मार्ट सिटीच्या बैठकीला मी स्वत: उपस्थित होतो. आयुक्तांनी विरोधी पक्षनेत्याचा अवमान केला नाही. साने जो मुद्दा मांडत होतो, तो अज्ञातून होईल, असेच आयुक्त म्हणाले होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेला श्रावण हर्डीकर यांच्या रुपाने चांगले आयुक्त मिळाले आहेत. ते अतिशय हुशार असून चांगले काम करत आहेत. हर्डीकर एक रुपया देखील खात नाहीत, असा दावा देखील पवार यांनी केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.