Pimpri News : कचरा गाड्यांवर आता महापालिका मुख्यालयातूनच ‘वॉच’!

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी आणि हा कचरा कचरा डेपोत घेऊन जाण्यासाठी 387 गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.(Pimpri news) यासाठी दोन ठेकेदारांची महापालिकेच्या आरोग्य विभागाने नेमणूक केली आहे, मात्र अनेक भागात कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या येत नसल्याच्या तक्रारी महापालिकेकडे येत आहेत. या गाड्यांवर जीपीएस यंत्रणा असूनही आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती मिळत नाही. त्यामुळे आता महापालिकेतच कंन्ट्रोल रूम करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरी घंटागाड्यांमार्फत कचरा गोळा करून हा कचरा मोशीतील कचरा डेपो येथे डम्पिंग केला जातो. शहरात सुमारे 1100 टन दररोज कचरा निर्माण होतो. यासाठी बीव्हीजी आणि ए. जी. एनव्हायरो या दोन ठेकेदारांची नेमणूक केली आहे. या ठेकेदारांच्या घंटागाड्या, कॉम्पफॅक्‍टर आणि डंपरच्या माध्यमातून कचरा गोळा करण्यात येतो. मात्र, शहरातील अनेक भागात वेळेवर अथवा घंटागाड्या येत नसल्याच्या तक्रारी येत आहे. या सर्व गाड्यांना व्हेईकल ट्रॅंकिंग मॅनेजमेनंट सिस्टीम आहे.

Alandi News : पगारवाढ बैठकीनंतर आळंदीतील सफाई कर्मचाऱ्यांची कामास सुरवात

यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन्ही ठेकेदारांनी दापोडीत एकाच ठिकाणी सेंन्ट्रल केले आहे. तसेच आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांच्या मोबाईलवरही गाड्यांची माहिती मिळत आहे. (Pimpri News) कचरा गाड्यांवर आता महापालिका मुख्यालयातूनच ‘वॉच’! मात्र, महापालिकेतील आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती मिळत नाही. त्यामुळे आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठणकर यांनी आता महापालिकेतच कंन्ट्रोल रूम करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत माहिती देताना उपायुक्त चारठणकर म्हणाले, कचरा गाडी एखाद्या भागात गेली की नाही? याची महापालिकेत माहिती मिळत नाही.(Pimpri news) त्यामुळे या कचरा गाड्यांवर माहिती महापालिकेत बसून मिळावी, यासाठी महापालिकेतच कंन्ट्रोल रूम करण्याचा निर्णय घेतला आहे. मोशी कचरा डेपोला किती कचरा गेला, याची सर्व माहिती मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.