PCMC Job Recruitment : नोकर भरती! 386 पदांसाठी तब्बल 1 लाख 30 हजार अर्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (PCMC Job Recruitment) विविध विभागातील ‘ब’ आणि ‘क’ गटातील 386 पदांसाठी तब्बल 1 लाख 30 हजार 470 अर्ज महापालिकेकडे ऑनलाइन प्राप्त झाले आहेत. यामध्ये 84 हजार 847 उमेदवारांनी परिक्षा शुल्क भरले असून 45 हजार 623 जणांचे परिक्षा शुल्क भरणे बाकी आहे. लिपिकांच्या 213 जागांसाठी तब्बल 51 हजार 161 अर्ज आले आहेत. अर्ज भरण्यास 19 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. आता मुदतवाढ देण्याचा विचार नसल्याचे प्रशासन विभागाचे बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.

राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नोकर भरतीवरील निर्बंध उठविले आहेत. त्यानंतर प्रशासनाने विविध पदांसाठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली. महापालिकेची वैद्यकीय विभागातील भरती प्रक्रिया न्यायालयीन कचाट्यात अडकली आहे. महापालिका सेवेतून दरमहा नियत वयोमानानुसार 20 ते 25 अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. काही कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत. त्यामुळे महापालिकेत सुमारे पाच हजार पेक्षा पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठी महापालिकेने सरळ सेवा भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले होते.

विविध विभागातील ‘ब’ आणि ‘क’ गटातील 386 रिक्त पदांसाठी सरळ सेवेने भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यामध्ये लिपिक-213, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)- 75, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक-41, कनिष्ठ अभियंता (विद्युत)-18, आरोग्य निरीक्षक-13, अतिरिक्त कायदा सल्लागार-1, विधी अधिकारी-1, उपमुख्य अग्शिमन अधिकारी-1, उद्यान निरीक्षक-4, हॉट्रीकल्चर सुपरवायझर-8 अशी विविध पदांसाठी महापालिकेने ऑनलाईन अर्ज मागविले होते. त्यात लिपिक या पदासाठी सर्वाधिक म्हणजेच 51 हजार 161, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)साठी 43 हजार 412, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी 17 हजार 285, कनिष्ठ अभियंता (विद्युत)साठी 6, हजार 951, आरोग्य निरीक्षक 3 हजार 500, समासेवक 2 हजार 629, हॉट्रीकल्चर सुपरवायझर 868, उद्यान अधिक्षक 623, कोर्ट लिपिक 461 असे आदी पदांसाठी 1 लाख 30 हजार 470 अर्ज (PCMC Job Recruitment) आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.