PCMC : ऑक्‍टोबरमध्ये महापालिका निवडणुका?

एमपीसी न्यूज – येत्या काही दिवसांतच पावसाळा सुरू होणार असल्याने (PCMC) आता वेळ कमी आहे. त्यामुळे ऑक्‍टोबरमध्ये महापालिका निवडणुका होतील, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. तसेच पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार कामाला लागावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे पिंपरी-चिंचवड शहर दौऱ्यावर आले होते. भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, आमदार अश्‍विनी जगताप, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्यासह माजी नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pimpri News : आगामी निवडणुकांमध्ये प्रस्थापित राजकीय पक्षांची साथ सोडा-अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

बावनकुळे  म्हणाले, महापालिका निवडणुका घेण्यासाठी आता पुरेसा वेळ नाही. पावसाळ्यात निवडणुका घेणे शक्‍य नाही. त्यामुळे ऑक्‍टोबरमध्ये निवडणुका होतील. निवडणुकांमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होईल, अशा पद्धतीने निवडणुकीची तयारी करायची आहे.

त्यासाठी प्रत्येक घरापर्यंत पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोहचले पाहिजे. महापालिका निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. मात्र, त्यासाठी पक्षाचे सरल ऍप घरोघरी पोहचले पाहिजे. किती जणांनी किती जणांपर्यंत ऍप पोहचवले आहे याची पाहणी मी स्वत: करणार आहे. त्यावरून महापालिकेत कोणाला तिकिट द्यायचे याचा निर्णय मी घेणार आहे. पक्षाचे सरल ऍप किमान 60 हजार कुटुंबांपर्यंत पोहचून ते डाऊनलोड करून घेणे आवश्‍यक (PCMC) आहे. शहरातील पक्षाच्या दोन्ही आमदारांनी हे टार्गेट पूर्ण करणे आवश्‍यक आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.