Pune : तब्बल 700 जणांना दहावी पासचे बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

एमपीसी न्यूज- पुणे पोलिसांच्या गुन्हे (Pune) शाखेच्या पथकाने मोठा घोटाळा उघडकीस आणला आहे. बनावट वेबसाईट तयार करून त्याद्वारे तब्बल 700 जणांना दहावी पासचे बनावट प्रमाणपत्र दिल्याचे उघडकीस आणले आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणी छत्रपती संभाजी नगरच्या एका टोळीच्या मुस्क्या आवळल्या आहेत.

कृष्णा सोनाजी गिरी, अल्ताफ शेख, सय्यद इमरान सय्यद इब्राहिम अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. स्वारगेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.

PCMC : ऑक्‍टोबरमध्ये महापालिका निवडणुका?

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, दहावी नापास विद्यार्थ्यांना पास असल्याचे बनावट प्रमाणपत्र देणारी टोळी असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करून संदीप ज्ञानदेव कांबळे याच्याशी संपर्क साधला. हाताने प्रमाणपत्रासाठी 60000 रुपये लागतील असे सांगितले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने काही पैसे भरून सापळा रचण्यात आला. आणि याच सापळ्यात संदीप कांबळे अडकला. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने इतर आरोपींच्या सहभागाची कबूल केली.

आरोपींनी छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल सुरू केले आहे. वेबसाईट सुरू करून दहावी पास प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली होती. आतापर्यंत त्यांनी 700 जणांना अशाप्रकारे दहावी आणि बारावी पास चे बनावट प्रमाणपत्र दिल्याचे निष्पन्न झाले आहे. हे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोपींनी ठिकठिकाणी एजंट नेमले होते. हे एजंट गरजूंना संपर्क साधायचे आणि 35 ते 50 हजार रुपये घेऊन (Pune) त्यांना बनावट प्रमाणपत्र द्यायचे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.