PCMC : महापालिका कर्मचाऱ्यांची  धन्वंतरी याेजना बंद, विमा पाॅलिसी लागू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांसाठी सुरू ( PCMC) असलेली धन्वंतरी याेजना बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी  विमा पाॅलिसी लागू केली असून  विमा कंपनीच्या खात्यात 27 काेटी 73 लाख रूपये वर्गही करण्यात आले आहेत.

महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी तसेच कुटुंब व्याख्येनुसार, त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंबीय आणि सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी धन्वंतरी स्वास्थ योजना 1 सप्टेंबर 2015 पासून सुरू करण्यात आली. धन्वंतरी स्वास्थ योजनेचे महापालिका आस्थापनेवर 6 हजार 827 आणि सेवानिवृत्तीधारक अडीच हजार असे एकूण 9 हजार 327 सभासद आहेत. योजना सुरू झाल्यानंतर कुटुंब व्याख्येनुसार कर्मचारी, त्यांचे आई, वडील, दोन मुले अशा पाच व्यक्तींचा समावेश कर्मचाऱ्यांच्या अवलंबितांमध्ये करण्यात आला.

Pimpri Chinchwad Police : शहर पोलीस दलातील 13 निरीक्षकांची नेमणूक

महापालिका सेवेत कार्यरत असणाऱ्या विमा पाॅलिसीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून दरमहा 300 रूपये इतका स्वहिस्सा आणि सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून दरमहा 150 रूपये स्वहिस्सा जमा केला जात आहे. एकूण जमा होणाऱ्या हिश्श्याच्या दुप्पट रक्कम महापालिका  विमा पाॅलिसी निधीत जमा करणार आहे. 3 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केला जाणार असून त्यापुढे मोठा आजार असेल तर 20 लाख पर्यंत उपचार केले जाणार आहेत. देशातील  सात हजार मान्यता प्राप्त रुग्णालयामध्ये अधिकारी, कर्मचा-यांना माेफत उपचार ( PCMC) घेता येणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.