PCMC : महापालिकेचा अग्निशमन विभाग होणार सक्षम, 150 फायरमनची भरती

एमपीसी न्यूज –पिंपरी-चिंचवड शहराचा दिवसेंदिवस विस्तार( PCMC) होत असताना लोकवस्त्या आणि औद्योगिक भागात सातत्याने लहान-मोठ्या आगीच्या घटना घडत आहेत.  मात्र, अग्निशमन केंद्रांची संख्या आणि मनुष्यबळ अपुरे असल्याने आगीच्या घटनांवर नियंत्रण आणताना अडचणी येतात. यासाठी अग्निशमन विभागात 150 फायरमनची सरळसेवेने भरती करण्यात येणार आहे.

Alandi : शॉर्टसर्किटमुळे अन्नपूर्णा माता आश्रमाच्या स्टोर रूमला आग

शहराची लोकसंख्या सुमारे 30 लाखांच्या घरात आहे. शहरात झोपडपट्ट्यांबरोबरच दाट लोकवस्तीचा भाग मोठ्या प्रमाणात आहे. टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. मोठ्या संख्येने औद्योगिक तसेच आयटी कंपन्या सुरू झाल्या आहेत. नियमाप्रमाणे लोकसंख्येनुसार शहरामध्ये 18 अग्निशमन केंद्रे असणे गरजेचे आहे. मात्र, सद्य:स्थितीत शहरात केवळ 8 केंद्रे आहेत. लोकसंख्या वाढत असताना अग्निशमन विभागात अपुरे मनुष्यबळ असल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. अग्निशमन विभागात प्रशासकीय कामकाजामधील अधिकारी, कर्मचारी वगळता 6 लिडिंग फायरमन तर फक्त 30 फायरमन कार्यरत आहेत. भविष्यात पिंपरीत मध्यवर्ती केंद्रासह 10 केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे मनुष्यबळाची आणखी गरज आहे.

अग्निशमन विभागात कर्मचारी संख्या वाढविण्याच्या दृष्टीने महापालिकेने तयार केलेल्या आकृतीबंधानुसार 191 पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यानुसार यामध्ये 150 फायरमन, 10 सब ऑफिसर, 6 स्टेशन ऑफिसर, 15 यंत्र चालक, 10 लिडिंग फायरमन अशा 191 पदांची सरळ सेवेने भरती करण्याचे अग्निशमन विभागाचे भविष्यात नियाेजन आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील ड संवर्गातील अग्निशमन विमाेचन, फायरमन रेस्क्युअर हि 150 रिक्त पदे सरळसेवेने भरती करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागविले आहेत. या भरतीची सविस्तर माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध करून देण्यात आली ( PCMC) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.