PCMC News : महापालिका निवडणूक! ओबीसींसाठीच्या जागांची 29 जुलै रोजी आरक्षण सोडत

एमपीसी न्यूज : ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी ओबीसी प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिलांचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. (PCMC news) ही सोडत शुक्रवार (दि. 29)  जुलै रोजी काढण्यात येणार आहे.

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुक 2022 ची तयारी सुरु आहे. त्यानुसार आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी 31 मे 2022 रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली. (PCMC News) त्यात अनुसूचित जमाती महिला 2 व पुरुष 1, अनुसूचित जाती महिला 11 व पुरुष 11, सर्वसाधारण महिला 57 अशा जागांवर आरक्षण सोडत काढण्यात आली होती. 114 जागांपैकी 38 ओबीसी जागांसाठी 76 सर्वसाधारण जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात एकूण 50 टक्केच्यावर जाणार नाही, या मर्यादेत  सर्वाेच्च न्यायालयाने नागरिकांच्या मागास प्रवर्ग यांना जागा राखून राजकीय आरक्षण देण्यात येणार आहे.

Ben Stokes: बेन स्टोक्सच्या निमित्ताने…

 

असा आहे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम!

26 जुलैला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व पुरुष आणि सर्वसाधारण महिला यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित  करण्याकरिता जाहीर नोटीस प्रसिध्द करण्यात येणार आहे.

29 जुलैला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व पुरुष आणि सर्वसाधारण महिला यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्यास सोडत काढण्यात येणार आहे.

30 जुलैला आरक्षण सोडतीनंतर प्रभाग निहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्यात येणार आहे. तर  30 जुलै ते 2 ऑगस्ट पर्यंत प्रभाग निहाय आरक्षण निश्चितीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी देण्यात येईल.

5 ऑगस्टला आरक्षण निश्चित प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांवर विचार करुन प्रभागनिहाय अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिध्द केले जाणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.