PCMC : महापालिका शाळांमध्ये ‘झिरो वेस्ट’ प्रकल्प

एमपीसी न्यूज – महापालिकेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील(PCMC) विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळावे यासाठी कोअर टीम व अधिकारी यांच्या क्षमता बांधणीकरिता अभ्यास दौरा दिल्ली येथे आयोजित केला जाणार आहे. महापालिका शाळांमध्ये झिरो वेस्ट (शुन्य कचरा) प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या उपस्थितीत स्थायी समितीची बैठक(PCMC) झाली. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

Pune : पुण्यात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या

यावेळी महापालिकेचे प्रभाग क्र. 11 मधील म्हेत्रेवस्ती दवाखान्याची अस्तित्वातील इमारतीची अत्यावश्यक व तातडीची कामे करणेकामी तसेच ग क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत विद्यानिकेतन प्राथमिक शाळा पिंपरी वाघेरे या इमारतीचे स्थापत्य विषयक देखभाल दुरूस्तीची कामे करणे, अ, क, ह, ग क्षेत्रीय कार्यालयातंर्गत येणाऱ्या महापालिकेच्या विविध प्रशासकीय इमारतींवर रुफ टॉप सोलर सिस्टीम प्रदान करणेबाबत तसेच अ, ब, ड प्रभाग अंतर्गत विविध ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा उभारणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

ग क्षेत्रीय कार्यालयातंर्गत थेरगाव येथील यशंवतराव चव्हाण हिंदी शाळा तसेच यशंवतराव चव्हाण उर्दु प्राथमिक शाळा या इमारतीचे स्थापत्य विषयक देखभाल दुरूस्तीची कामे करणे,महापालिकेच्या विविध क्रीडा सुविधांच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा उभारणेबाबत येणाऱ्या खर्चास तसेच विविध 26 गणेश विसर्जन घाटांवर खाजगी जीवरक्षक नेमणुकीकरिता आलेल्या खर्चास मान्यता देण्यात आली.

महापालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र, सेक्टर 23 येथे निर्जुंकीकरण प्रक्रियेसाठी स्टेबल ब्लिचिंग पावडर वाढीव परिमाण खरेदी करणे, थेरगाव गावठाण मधील विविध ठिकाणी फुटपाथ दुरूस्ती व डिव्हायडर दुरूस्ती व इतर स्थापत्य विषयक कामे करणे, प्रभाग क्र. 5 गवळीनगर येथील नंदनवन कॉलनी, संत तुकाराम नगर, शिव ज्योत कॉलनी व इत्यादी ठिकाणचे पेव्हिंग ब्लॉक सुधारणा करणे व स्थापत्य विषयक कामे करणे, प्रभाग क्रमांक 23 , थेरगाव गावठाण येथील महापालिकेच्या इतर इमारतींमधील स्थापत्य विषयक दुरूस्तीची कामे करणे, पिंपळेगुरव व प्रभागातील इतर परिसरातील रस्त्यावरील खड्डे, ट्रेंचेस, इत्यादींची बी. एम., बी. सी., कोल्ड मिक्स पद्धतीने दुरूस्तीची कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

महापालिकेचे प्रभाग क्रमांक 21 पिंपरी येथील नाल्यांना बेडिंग करणे, भिंतीची दुरूस्ती करणे व इतर अनुषंगिक कामे करणेकामी तसेच प्रभाग क्रमांक 14 मोहननगर, आकुर्डी व परिसरातील शाळा इमारतींची देखभाल दुरूस्ती करणेकामी, वैदु वस्ती परिसरात जलनि:सारण विषयक सुधारणा कामे करणे,
ताथवडे, पुनावळे, दळवीनगर, संतोषनगर व इतर परिसरात जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे, उर्वरित ठिकाणी जलनि:सारण नलिका टाकणे, तसेच पिंपळेगुरव, श्रीधरनगर, दत्तमंदिर व इतर परिसरात जलनि:सारण विषयक सुधारणा कामे, प्रभाग क्रमांक 17 मधील स्वच्छ भारत अंतर्गत संडास मुताऱ्यांची देखभाल दुरूस्ती व इतर स्थापत्य विषयक कामे, तसेच प्रभाग क्रमांक 22 काळेवाडी मधील स्मशानभुमीमध्ये स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.