गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022

PCMC News: अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या विभागात बदल करण्यात आले आहेत. अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्याकडील सुरक्षा विभाग अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे देण्यात आला आहे.(PCMC News) आयुक्त राजेश पाटील यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप केले आहे.

महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश झाल्यामुळे तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत. प्रतिनियुक्तीवरील अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (एक) जितेंद्र वाघ (दोन) आणि स्थानिक उल्हास जगताप (तीन) यांच्या कामकाजाचे आयुक्त राजेश पाटील यांनी वाटप केले आहे.

 

Pavana Dam: वर्षभराची पाण्याची चिंता मिटली! पवना धरणात 91 टक्के पाणीसाठा

अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्याकडील सुरक्षा विभाग अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे देण्यात आला आहे. तर, ढाकणे यांच्याकडील आपत्ती व्यवस्थापन विभाग जगताप यांच्याकडे देण्यात आला आहे.(PCMC News) जगताप यांच्याकडील कामगार कल्याण विभाग अतरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्याकडे देण्यात आला आहे. वाघ यांच्याकडील बीएसयुपी,ईडब्लूएस प्रकल्प जगताप यांच्याकडे देण्यात आला आहे.

 

spot_img
Latest news
Related news