Chakan News : पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावत कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – कामाची वेळ संपल्यानंतर कंपनीतून घरी निघालेल्या पादचारी तरुणाला तिघांनी अडवून मोबाईल हिसकावला. त्यानंतर तरुणावर कोयत्याने वार केले. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 19) दुपारी निघोजे येथील केलविन कंपनी समोर घडली.

अजिंक्य तुकाराम सावंत (वय 28, रा न-हे धायरी. मूळ रा सातारा) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात तीन इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी पावणे पाच वाजताच्या सुमारास फिर्यादी सावंत निघोजे येथील केलविन कंपनीतून घरी जाण्यासाठी निघाले. कंपनीपासून 50 मीटर अंतरावर आले असता पाठीमागून एका दुचाकीवर तीन अनोळखी इसम आले.

त्यांनी फिर्यादी यांच्या हातातील बारा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावला. त्यामुळे फिर्यादी यांनी फोन परत मागील असता एका आरोपीने फिर्यादी यांच्यावर लोखंडी कोयत्याने वार केले. यामध्ये फिर्यादी यांच्या हाताला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.