Nigdi News :  महिलेच्या गळ्यातील 90 हजारांचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील 90 हजारांचे  मंगळसूत्र भरदिवसा चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना शनिवारी (दि. 20) दुपारी साडे पाच वाजताच्या सुमारास प्राधिकरण निगडी येथे घडली.

वैशाली संदीप खैरनार (वय 40, रा. दत्तवाडी आकुर्डी) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील एका अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी साडे पाच वाजताच्या सुमारास फिर्यादी खैरनार प्राधिकरण निगडी येथील सेक्टर क्रमांक 24 मधून रस्त्याने पायी जात  होत्या. त्यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या एका अनोळखी चोरट्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील 90 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने चोरले. त्यानंतर चोर लोकमान्य हॉस्पिटलच्या दिशेने पळून गेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.