Talegaon Dabhade : ग्राम सुरक्षा दलाच्या गस्तीमुळे चोऱ्यांना आळा

एमपीसी न्यूज :  तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनशी संलग्न ग्राम सुरक्षा दल समितीकडून रोज रात्री नियमितपणे गस्त घातली जात आहे. त्यामुळे तळेगावमध्ये रात्रीच्या वेळी होणाऱ्या चो-या तसेच विनाकारण दुचाकीवरुन गोंगाट करत फिरणाऱ्यांवर आळा बसला आहे.

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या हस्ते तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुमारे 200 ग्रामसुरक्षा दल सदस्यांची नेमणूक करण्यात आली. त्या सदस्यांना पोलीस स्टेशनकडून सिटी, लाठी व ओळखपत्र देण्यात आले आहे.

त्याच अनुषंगाने तळेगाव दाभाडे गावभाग व स्टेशन परिसरात तसेच तळेगाव-दाभाडे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सर्व ठिकाणी अनेक भागांमध्ये दुचाकी व तत्सम वाहनांवर ग्राम सुरक्षा दलाचे सभासद गस्त घालत असतात. त्यामुळे तळेगावात व पोलीस स्टेशनच्या हद्दीत होणाऱ्या अनुचित घटनांना चांगलाच आळा बसलेला आहे.

विशिष्ट अशा ग्रुप वर रात्री बारा ते पहाटे चार पर्यंत चे वेगवेगळे लोकेशनचे फोटो टाकून “आम्ही जागे आहोत” किंवा “आपल्या परिसरात शांतता आहे” अशा आशयाचे सेल्फी सहित संदेश

टाकून तो परिसर शांत असल्याचे व्हाटस अप  ग्रुपवर कळत असल्याने पोलीसांना देखील त्या परिसरातील माहिती समजत आहे. या ग्रामसुरक्षा दलाच्या रात्रीच्या गस्तीमुळे  गेल्या पंधरा-वीस दिवसांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

रोज रात्री पोलीस स्टेशन कडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याची रात्रीच्या गस्तीसाठी नेमणूक केली आहे. याची माहिती विशिष्ट ग्रुपवर दिली जाते. काही अडचण आल्यास लागलीच सदस्य त्या अधिकाऱ्याशी संपर्क साधतात .व त्या अडचणीचे निवारण होते या ग्रामसुरक्षा गस्तीचे तळेगावकर नागरिकांकडून स्वागत व समाधान व्यक्त केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.