Bhosari News : खाल्लेल्या पाणीपुरीचे पैसे न देता पाणीपुरी विक्रेत्याला मारहाण

तीन फूकट्या ग्राहकांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – खाल्लेल्या पाणीपुरीचे पैसे पाणीपुरी विक्रेत्याने मागितले. त्यावरून तिघांनी मिळून पाणीपुरी विक्रेत्याला मारहाण केली. याबाबत तीन फुकट्या ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि. 20) सायंकाळी कासारवाडी रेल्वे गेटच्या जवळ घडला.

मयूर पवार, विशाल खंदारे आणि त्यांचा अनोळखी साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत करण शामलाल अहिर (वय 19, रा. कासारवाडी. मूळ रा. राजस्थान) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी करण हे पाणीपुरी विकण्याचे काम करतात. शनिवारी सायंकाळी कासारवाडी रेल्वे गेटच्या जवळ पाणीपुरी विक्रीचे काम करत असताना आरोपी तिथे आले. त्यांनी फिर्यादी यांच्याकडून पाणीपुरी खाल्ली.

त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपींना खाल्लेल्या पाणीपुरीचे पैसे मागितले. त्यावरून आरोपींनी फिर्यादी यांना मारहाण तसेच शिवीगाळ करून फिर्यादी यांच्या हातगाडीच्या गल्यातील 1 हजार 100 रुपये जबरदस्तीने चोरून नेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.