Vaccine For Children : 7 ते 11 वयोगटातील मुलांवर लसीकरणाच्या ट्रायलला सीरम इंन्स्टिट्यूटला परवानगी

एमपीसी न्यूज : आता लहान मुलांना कोरोनापासून सुरक्षित करण्यासाठी कोविड लसीकरणाची ट्रायल सुरु आहे. त्यामुळं लवकरच लहान मुलांसाठी लस येण्याची आशा निर्माण झाली आहे. आधी 12 वर्षांवरील मुलांवर ट्रायल सुरु केल्यानंतर आता 7 ते 11 वयोगटातील मुलांवर लसीकरणाच्या ट्रायलला सीरम इंन्स्टिट्यूटला परवानगी मिळाली आहे.

भारताममध्ये अनेक राज्यांमधील शाळा हळूहळू सुरु होऊ लागल्या आहेत. लहान मुलांना कोरोनापासून सुरक्षित करण्यासाठी लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या लसीवर काम करत आहेत. सीरम इंस्टिट्यूट 7 ते 11 वयोगटातील मुलांसाठी अमेरिकेची कंपनी नोवावॅक्सच्या लसीवर संशोधन करत आहे. कंपनीनं भारतात या लसीचं नाव कोवावॅक्स ठेवलं आहे. भारतीय औषध नियामक मंडळाने (DCGI) सीरम इंस्टीट्यूटला 7 ते 11 वयोगटातील मुलांवर नोवावॅक्सच्या लसीच्या ट्रायलसाठी परवानगी दिली आहे.

12-17 वयोगटातील मुलांवर ट्रायलसाठी आधीच परवानगी
भारतीय औषध नियामक मंडळाने (DCGI) सीरम इंस्टीट्यूटला 12-17 वयोगटातील मुलांवर नोवावॅक्सच्या लसीच्या ट्रायलसाठी आधीच परवानगी दिली आहे. कंपनीने ही ट्रायल देशभरातील 100 मुलांवर केली आहे. मात्र या लसीच्या आपत्कालीन वापराला देशात अद्याप तरी मंजूरी मिळालेली नाही. देशात केवळ झायडस कॅडिलाच्या लसीलाच 12 वर्षांहून अधिक वय असलेल्या मुलांना आपत्कालीन वापरासाठी मंजूरी मिळालेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.