Pimpri : पिंपरी, चिंचवड, भोसरीतील 35 उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ गुल

एमपीसी न्यूज – पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील 41 पैकी तब्बल 35 उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त झाले आहे. केवळ, तीन उमेदवारांना त्यांचे ‘डिपॉझिट’ (अनामत रक्कम) परत मिळू शकणार आहे. तीनही मतदारसंघात दुरंगी लढाई झाल्याने उर्वरित उमेदवारांना मानहानीकारकपणे पराभव पत्करावा लागला आहे.

उमेदवाराला मतदार संघात प्रत्यक्षात झालेल्या एकूण मतांच्या किमान एक षष्ठांश मते मिळणे आवश्यक आहे. मात्र, पिंपरी, चिंचवड आणि भोसरीतील बहुतांशी उमेदवार त्यात अपयशी ठरल्याचे निकालावरुन स्पष्ट झाले आहे. तिन्ही मतदारसंघातून 41 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी अवघ्या 3 उमेदवारांना त्यांचे ‘डिपॉझिट’ (अनामत रक्कम) परत मिळू शकणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी विधानसभा मतदार संघातून 18 उमेदवार रिंगणात होते. याठिकाणी 1 लाख 77 हजार 387 मतदान झाले. येथील उमेदवाराला डिपॉझिट वाचविण्यासाठी किमान 29 हजार 565 मतांची आवश्यकता होती. मात्र त्यात 16 उमेदवारांना अपयश आले. त्यात वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब गायकवाड (13681), बसपचे धनराज गायकवाड (1213), गोविंद हेरोडे (262), संदीप कांबळे (254) , बाळासाहेब ओव्हाळ (936), अ‍ॅड. मुकुंदा ओव्हाळ (296) , अजय लोंढे (287), दीपक जगताप (295), चंद्रकांत माने (212), नरेश लोट (155), हेमंत मोरे (568), युवराज दाखले (482), अजय गायकवाड (461), डॉ. राजेश नागोसे (350), दिपक ताटे (430), मीना खिलारे (305) या अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

चिंचवड मतदार संघातून 11 उमेदवार रिंगणात होते. याठिकाणी 2 लाख 77 हजार 750 मतदान झाले. येथील उमेदवाराला किमान 46 हजार 292 मतांची आवश्यकता होती. मात्र, 9 उमेदवारांना एक षष्टांश मते मिळविता आली नाहीत. त्यात बसपाचे राजेंद्र लोंढे (3954), नितीशा लोखंडे (725), एकनाथ जगताप (569), महावीर संचेती (903), शेकापच्या छायावती देसले (569), सुरज खंडारे (384), डॉ. मिलिंदराजे भोसले (498), राजेंद्र काटे (332 ), रवींद्र पारधे (1475) या अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

भोसरी विधानसभा मतदार संघात 2 लाख 62 हजार 976 एवढे मतदान झाले होते. त्यानुसार उमेदवाराला ‘डिपॉझिट’ वाचविण्यासाठी 43 हजार 829 मतांची आवश्यकता होती. 12 पैकी 10 उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त झाले आहे. त्यात समाजवादी पक्षाच्या वहिदा शेख (611) , विश्वास गजरमल (706), वंचित बहुजन आघाडीचे शहानवाज शेख (13165) , विजय आराख (426) , बसपचे राजेंद्र पवार (1861) , अपक्ष हरेश डोळस (243) , ज्ञानेश्वर बो-हाटे (606) , भाऊसाहेब अडागळे (300), छाया जगदाळे (502), मारुती पवार (384) यांचा त्यात समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.