Pimpri : स्वाईन फ्लूने एकाच दिवशी दोन महिलांचा मृत्यू; मृतांचा आकडा 39 वर

 

एमपीसी न्यूज – स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूने एकाच दिवशी दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मागील आठ महिन्यात पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 39 झाली आहे.

पिंपळे सौदागर येथे राणा-या 35 वर्षीय महिलेला 31 ऑगस्ट रोजी स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्याने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या महिलेला स्वाईन फ्लूपूर्वी न्यूमोनियाचा देखील आजार होता. तिच्यावर उपचार सुरु असताना मंगळवार (दि. 5) रोजी तिचा मृत्यू झाला. तसेच खेड येथील 30 वर्षीय महिलेला दोन सप्टेंबर रोजी स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यावरून शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना त्या देखील महिलेचा मंगळवार (दि. 5) रोजी मृत्यू झाला.

जानेवारीपासून आतापर्यंत शहरात 312 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 262 रुग्णांना बरे होऊन घरी पाठविण्यात आले आहे.

सौम्य ताप, घशात खवखव, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, उलट्या, जुलाब अशी लक्षणेस्वाईनफ्लूच्या प्राथमिक अवस्थेत आढळून येतात. आजाराच्या पुढील टप्प्यात 38 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक ताप, तीव्र घसादुखी, घशाला सूज येणे, धाप लागणे, छातीत दुखणे, रक्तदाब कमी होणे, खोकल्यावाटे रक्त पडणे, नखे निळसर काळी पडणे, लहान मुलांमध्ये चिडचिड, झोपाळूपणा अशी लक्षणे दिसून येतात. अजूनही 20 रुग्ण शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.