Pimpri: औद्योगिकनगरीत आज 165 नवीन रुग्णांची भर ; 82 जणांना डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू

Adding 165 new patients to the industrial city today; 82 discharged, two Death

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. शहराच्या विविध भागातील 160 आणि महापालिका हद्दीबाहेरील 5 अशा 165 जणांना आज (शनिवारी) कोरोनाची लागण झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 82 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गांधीनगर पिंपरीतील 52 वर्षीय पुरुष आणि पिंपळेसौदागर येथील 65 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरातील 2565 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

पालिकेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शहरातील फुलेनगर, दिघी रोड भोसरी, लक्ष्मीनगर पिंपळेगुरव, आनंदनगर चिंचवड, चांदणीनगर, प्लॅनेट मिनियम पिंपळे सौदागर, विकासनगर, निगडी, रामनगर, जाधववाडी, राजीव गांधी वसाहत नेहरुनगर, शंकरनगर, साईबाबानगर चिंचवड, अजंठानगर, महेशनगर भोसरी, इंदिरानगर चिंचवड, घुलेचाळ बोपखेल, प्राधिकरण, गांधीनगर पिंपरी, थेरगाव, बिजलीनगर चिंचवड, स्टेशन रोडपिंपरी, वाकड, म्हेत्रेवस्ती चिखली, भाटनगर पिंपरी, गवळीमाथा भोसरी, ज्योतिबानगर काळेवाडी, सुदर्शननगर चिखली, मंजुबा चौक पिंपळे सौदागर, आनंदनगर सांगवी, रुपीनगर तळवडे, बापदेवनगर देहुरोड, जयमहाराष्ट्र चौक कासारवाडी, आर्दशनगर दिघी, विठ्ठलनगर पिंपरी, बौध्दनगर पिंपरी, भिमनगर पिंपरी, लक्ष्मीचौक दापोडी, गणेशनगर थेरगाव, केशवनगर कासारवाडी, प्रेमलोकपार्क चिंचवड, सोनाई नगर दापोडी, म्हाडा बिल्डींग पिंपरी, सहारा कॉम्पलेक्स चिखली, काळेवाडी, क्रिश्ना पार्क थेरगाव, संत ज्ञानेश्वरनगर मोरवाडी, काळभोरनगर चिंचवड, लिंकरोड पिंपरी, प्रियदर्शनीनगर सांगवी, पंचतारानगर आकुर्डी, वैदुवस्ती पिंपळे गुरव, रमाबाईनगर पिंपरी, लांडगेनगर भोसरी, लक्ष्मीनगर पिंपळेगुरव, विशालनगर पिंपळेनिलख, शिव क्लासिक सोसयटी मोशी, नटराज सोसायटी नेहरुनगर, डिमार्टजवळ चिंचवड, वास्तुउद्योग अजमेरा, खंडोबामाळ भोसरी, प्रभातनगर पिंपळे गुरव, ऍव्हलॉन सिटी दापोडी, कुलदिप आंगन नेहरुनगर, मंगलनगर वाकड, गंगानगर निगडी, आश्रमरोड चिखली, भगतवस्ती भोसरी, प्रविणनगर तळवेड, त्रिवेणीनगर तळवडे, नखातेवस्ती, केशवनगर चिंचवड, शुभश्री आकुर्डी, दिघीरोड भोसरी, एम्पायर इस्टेट चिंचवड, कोकणेनगर काळेवाडी, कैलासनगर थेरगाव परिसरातील 160 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

त्यामध्ये 88 पुरुष आणि 72 महिलांचा समावेश आहे. तर, जुन्नर, हडपसर, बोपोडी, सोलापुर येथील 3 पुरुष आणि 2 महिला अशा 5 जणांनाही कोरोनाची बाधा झाली. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तर, सानेवस्ती चिखली, बौध्वनगर पिंपरी, हॉटेल सृष्टी पिंपळे गुरव, भारतनगर दापोडी, वैदुवस्ती पिंपळे गुरव, विशालनगर पिंपळे निलख, पवारवस्ती दापोडी, आनंदनगर सांगवी, दिघीरोड भोसरी, बोपखेल, साईबाबनगर चिंचवड, पाचपीर चाळ काळेवाडी, सिध्दार्थनगर दापोडी, यमुनानगर निगडी, अजंठानगर, इंद्रायणीनगर भोसरी, जगताप डेअरी पिंपळे निलख, रौंधळे चाळ दापोडी, जयभिमनगर दापोडी, आनंदनगर चिंचवड, घरकुल चिखली, सुदर्शननगर चिखली, कोकणेनगर काळेवाडी, पुर्णानगर, दत्तनगर चिंचवड, मिलींदनगर पिंपरी, रिव्हररोड पिंपरी, बिजलीनगर चिंचवड, गणेशनगर सांगवी, गांधीनगर पिंपरी, बौध्दनगर पिंपरी, केंद्रीय विद्यालय मोशी, शर्माचाळ नेहरुनगर, येरवडा, कुर्डुवाडी, गणेशखिंड, देहुरोड कॅन्टोनमेंट, मंगळवार पेठ, बोपोडी येथील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 82 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.

शहरात आजपर्यंत 2565 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1552 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 43 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 27 अशा 70 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 994 सक्रीय रूग्णांवर महापालिका रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 566

# पॉझिटीव्ह रुग्ण – 165

#निगेटीव्ह रुग्ण – 379

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 546

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 1483

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 529

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 2565

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 994

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 70

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 1525

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 23051

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 71612

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.