Pimpri : ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचा फुकट पास मागणारा कर्मचारी निलंबित

एमपीसी न्यूज – ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचा एका (Pimpri) पोलिसाने फुकट पास मागितल्याचा प्रकार उघडकीस आला. फुकट पास न दिल्यास ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे प्रयोग होऊ देणार नाही, अशी धमकी दिली असल्याचा आरोप खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. याची गंभीर दखल घेत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

पोलीस नाईक महेश नाळे (नेमणूक – पिंपरी पोलिस ठाणे) असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे.

पिंपरी येथील एचए मैदानावर ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे प्रयोग सुरू आहेत. यापूर्वी झालेल्या छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, कराड या ठिकाणी झालेल्या महानाट्याच्या प्रयोगाला पोलिसांनी चांगले सहकार्य केले.

मात्र, पिंपरी चिंचवड पोलीस दलातील एका पोलिसाने फुकट पास न दिल्यास प्रयोग होऊ देणार नाही, अशी धमकी दिल्याचे डॉ. कोल्हे यांनी जाहीररित्या सांगितले. तसेच, धमकी देणाऱ्या पोलीसांना कडक समज द्यावी, अशी मागणी गृहमंत्र्यांकडे केली.

याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल (Pimpri) झाला. त्यामुळे नेटकऱ्यांनी पोलिसांचा खरपूस समाचार घेतला. पोलीस दलाची बदनामी होत असल्याचे लक्षात घेत पोलीस आयुक्त चौबे यांनी तडकाफडकी नाळे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. तसेच, पोलीस उपायुक्त डॉ. विवेक पाटील यांना संबंधित प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

Today’s Horoscope 15 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.