Pimpri : गुरुकुल संस्कृत अकॅडमीचा वार्षिक संस्कृत दिनोत्सव साजरा

एमपीसी न्यूज – गेल्या दशकाहून ही अधिक काळ संस्कृत भाषेच्या (Pimpri) प्रसारासाठी समर्पित अशा गुरुकुल संस्कृत अकॅडमी संस्थेने आपल्या परंपरे नुसार यंदा ही बुधवारी (दि.30) आंतरराष्ट्रीय संस्कृत दिवस, अतिशय उत्साहाने साजरा केला.

यावेळी कार्यक्रमात गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. संस्थापक आचार्य श्रीपद्मनाभ न्कृष्णदास व ज्येष्ठ अध्यापक  अजित मेनन ह्यांच्या परिश्रमांतून ही संस्था आकारास आलीआहे. दरवर्षी श्रावण पौर्णिमेच्या साधारण एक महिना अगोदर पासूनच पिंपरी, पुणे येथील गुरुकुल संस्कृत अकॅडेमी संस्थेच्या आबाल वृद्ध विद्यार्थ्यांची लगबग सुरु होते. विविध लघुनाटिका, भाषणे, स्तोत्रे, गीते, कथाकथन असे संस्कृत भाषेतले स्वरचित वेगवेगळे आविष्कार ह्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीतून हळुहळु आकारास येतात.

Shapit Gandharva : शापित गंधर्व – भाग 51 – कर्म देते पण दैव नेते….फराज खान

ह्या वर्षी देखील संस्कृत दिन महोत्सवात, संस्थेत शिकणाऱ्या विविध वयोगटातल्या, विविधप्रांतीय, वेगवेगळ्या मातृभाषा असणाऱ्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन व्यावहारिक संस्कृत भाषेत रचलेले, तत्त्वज्ञान, अध्यात्म, नीतिमूल्ये, आधुनिक समाज जीवन इत्यादी विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या आशयाचे कार्यक्रम समोर सादर केले.

संस्कृत भाषेतील साहित्याचे अंगभूत वैशिष्ट्य म्हणजे त्यातील रचनांचा वरवर समजणारा वाक्यार्थ आणि त्या खाली दडलेला त्या रचनांचा वास्तविक अंतरार्थ असे संयोजन. श्री हरिस्तोत्र म्वश्रीमद्नारायणीय यांच्या सुमधुर गायनाने वातावरण भारावून टाकले. आध्यात्मिक सद्गुरुंचे जीवन व कार्य स्पष्ट केले. वैद्य वेदना नाटिकेने कर्माचे महत्त्व जोरकसपणे  मांडले.

प्रथम चलचित्रस्य ऑडिशन या विडंबनांनी मनोरंजन केले. अहं त्वंचना टिकेने गुरुशिष्याचे नाते दाखवले. नवनवते:पाश: या मार्मिक लघु नाटिकेने संपत्तीच्या लोभाने मन:शांती चा होणार ऱ्हास प्रभावी पणे सादर केला. एकोऽहं नाटिकेने ईश्वराचे धर्मातीत स्वरूप ह्या विषयावर भाष्य केले. लघु भोजनाने महोत्सवाची सांगता (Pimpri) झाली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.