Pimpri : तळवडे येथील दुर्घटनाग्रस्त रुग्णांवर सुश्रुषा करण्यासाठी आठ अतिरिक्त स्टाफनर्सची ससूनमध्ये नेमणूक

एमपीसी न्यूज – तळवडे येथील आगीच्या दुर्घटनाग्रस्त (Pimpri)रुग्णांवर ससून सर्वोपचार रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत, त्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने जखमी रुग्णांसाठी वैद्यकीय पथकाची तसेच सुश्रुषा करण्यासाठी स्टाफनर्सची नेमणूक करण्यात आलेली होती.

आज त्यामध्ये वाढ करण्यात येऊन यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ.राजेंद्र वाबळे यांनी आठ अतिरिक्त स्टाफनर्सची तात्पुरत्या स्वरूपात थेट ससून रुग्णालय येथील बर्निंग वार्डमध्ये नेमणूक केली आहे.

त्यामध्ये यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (Pimpri)वैशाली जामूनकर,आरती शिनलकर, रेश्मा शेख आणि उषा केंद्रे यांचा तसेच थेरगाव रुग्णालयातील मोशीन शेख,भोसरी रुग्णालयातील शैलेश चावरे,आकुर्डी रुग्णालयातील आशिष तांबडे आणि जिजामाता रुग्णालयातील गौरव पवळ यांचा समावेश आहे.

Pimple Gurav : पिंपळे गुरवमधील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाला सुरुवात

दुर्घटनाग्रस्त रुग्णाच्या प्रकृतीबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह हे स्वतः आढावा घेत असून त्यांनी आवश्यक ती वैद्यकीय मदत देण्याचे निर्देश वैद्यकीय विभागास दिले आहेत.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.