Pimpri: वाढदिवसानिमित्त डॉक्टर, नर्ससाठी 95 पीपीई किट देऊन ‘अप्सरा’ सोनालीने जपली माणुसकी

Marathi actor Sonali Kulkarni donates 95 PPE kits to frontline warriors at YCMH dedicated Covid19 hospital in Pimpri Chinchwad on her Birtday. वाढदिवसानिमित्त जमवलेले पैशे, आलेल्या 'गिफ्ट'मधून सोनाली कुलकर्णीने पिंपरी महापालिकेच्या 'वायसीएमएच'मधील कोरोना विरोधात लढणाऱ्या वॉरियर्स डॉक्टर, नर्ससाठी 95 पीपीई किट दिले आहेत.

एमपीसी न्यूज – अभिनेते, अभिनेत्री फिल्मी झगमगाटात वावरत असले तरी त्यांच्या ह्रदयात जबाबदार नागरिक असतो…याचा प्रत्यय ‘अप्सरा’ फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पिंपरी-चिंचवडकराना दिला आहे. वाढदिवसानिमित्त जमवलेले पैशे, आलेल्या ‘गिफ्ट’मधून सोनालीने पिंपरी महापालिकेच्या ‘वायसीएमएच’मधील कोरोना विरोधात लढणाऱ्या वॉरियर्स डॉक्टर, नर्ससाठी 95 पीपीई किट दिले आहेत.

विशेष म्हणजे सोनाली भारतात नसताना देखील तिने आपले वडील, भाऊ यांच्यामार्फत वायसीएमएचकडे किट सुपूर्द केले आहेत. सोनालीच्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी, भाऊ अतुल कुलकर्णी आणि कलारंग संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी आज(सोमवारी) वायसीएमएचचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, भांडार व्यवस्थापक राजेश निकम यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याकडे किट सुपूर्त केल्या.

पिंपरी-चिंचवड शहरातील निगडीत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी वास्तव्यास आहे. तिचा आज वाढदिवस आहे. लॉकडाऊनमुळे ती दुबई येथे अडकली आहे. तिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला.

वाढदिवसानिमित्त जमलेले पैसे, मित्र-मैत्रिणीकडून गिफ्ट न घेता पैसे घेतले. या जमलेल्या पैशांतून सोनालीने आपल्या जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या डॉक्टर, नर्ससाठी 95 पीपीई किट खरेदी केल्या. स्वतः शहरात हजर नसताना वडील, भाऊ यांच्यामार्फत वायसीएमएचकडे किट सुपूर्द केल्या.

‌याबाबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली, आज माझ्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या लढाईविरोधात लढणारे फ्रंटलाईन वॉरियर्स, मेडिकल स्टाफ नर्स, डॉक्टर यांचे रक्षण व्हावे यासाठी 95 पीपीई किट किट देत आहे. मी पिंपरी-चिंचवड परिसरात राहते. शहरात कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यांच्यावर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

त्यामुळे मी ही माझी जबाबदारी समजून छोटीशी मदत करीत आहे. हे किट देताना माझे सहकारी कलाकार यांनीही मला मदत केली आहे. त्यांची मी आभारी आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त अजित पवार आणि कलारंग संस्थेचे अमित गोरखे यांची मी मनापासून आभारी आहे. आपण लवकरच या संकटातून बाहेर येवू अशी मी देवाकडे प्रार्थना करते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.