Pimpri : पैसे न देता शोरूममधून दुचाकी नेल्याप्रकरणी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा

एमपीसी न्यूज – दुचाकी घेताना कर्ज प्रक्रिया पूर्ण करता तसेच गाडीचे पैसे पूर्ण न भरता दुचाकी नेल्या प्रकरणी दोन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 28 एप्रिल 2019 रोजी पिंपरी येथील अल्फा ऑटो राईडर या शोरूम मध्ये घडली. याबाबत 15 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहम्मद सिद्दीकी आत्ताऊर रहेमान शेख (वय 24, रा. आंबेडकरनगर, देहूरोड), धरमसिंग दिलबाग सिंह धारीवाल (वय 30, रा. राजू शर्मा चाळ, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी मोहित किशोर नैनानी (वय 28, रा. भवानी पेठ, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहित यांचे पिंपरी मध्ये सुझुकी टूव्हीलर गाड्यांचे ‘अल्फा ऑटो राईडर’ नावाचे शोरूम आहे. 28 एप्रिल 2019 रोजी आरोपींनी त्यांच्या शोरूम मधून सुजुकी एक्सेस ही दुचाकी घेण्याच्या बहाण्याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून शोरूम मधून नेली. आरोपींनी दुचाकी घेताना केली जाणारी कर्ज प्रक्रिया पूर्ण न करता तसेच गाडीची पूर्ण रक्कम न देता फिर्यादी यांची फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.