Pimpri : भागीदारीत फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – व्यवसायात गुंतवणूक (Pimpri) करण्यास सांगून व्यवसायाच्या भागीदारीतून कोणतीही आर्थिक रक्कम न देता एकाची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मे 2013 ते सप्टेंबर 2017 या कालावधीत शगुन चौक, पिंपरी येथे घडला.

तुलसीदास साधुमल केवलाणी, साधुमल नथुमल केवलाणी, गोपाळ किशोर केसवाणी किशोर झामनदास केसवाणी (सर्व रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नवीन भगतराम अगरवाल (वय 48, रा.खडकी) यांनी 26 ऑक्टोबर रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिव कन्स्ट्रक्शनचे भागीदार अजित केसवाणी आणि तुलसीदास केवलाणी यांनी शगुन चौक, पिंपरी येथे एका जागेच्या विकसनासाठी 50 टक्के भागीदारी देतो असे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.

फिर्यादीकडून वेळोवेळी रक्कम घेतली. भागीदारी देण्याबाबत भागीदारी पत्र तयार करून घेतले. त्यानंतर 50 टक्के ऐवजी 30 टक्के भागीदारी हिस्सा घेण्यास सांगितले. फिर्यादी सोबत भागीदारी करारपत्र करण्यापूर्वी इतर महिलांना दुकानाची विक्री (Pimpri) केल्याची माहिती फिर्यादिपासून लपवून ठेवली.

Talegaon Dabhade : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दुचाकीची पिकपला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

त्यानंतर दुकानांची परस्पर गणेश कन्स्ट्रक्शनतर्फे साधुमल केवलाणी आणि गोपाळ केसवाणी यांना विकसित करारनामा करून दिला. महिलांना करेक्शन डीडद्वारे परस्पर जागा वाढवून दिली. हे दस्त तयार करताना फिर्यादी यांना पूर्वकल्पना दिली नाही. तसेच त्यांची संमती घेतली नाही.

जागेच्या विकसनासाठी व चिराग परमार यांना रक्कम देण्यासाठी फिर्यादीकडून एकूण एक कोटी 54 लाख रुपये घेऊन फिर्यादीस ठरल्याप्रमाणे कोणताही हिस्सा अथवा गुंतवणुकीची रक्कम न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.