Talegaon Dabhade : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दुचाकीची पिकपला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज –  जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भरधाव (Talegaon Dabhade ) दुचाकीने एका पिकअप ला धडक दिली. त्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुचाकीवरील सहप्रवासी गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी (दि. 27) मध्यरात्री पावणे एक वाजताच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथे एबीसी पंपाजवळ घडला.

अर्जुन राजेश विश्वकर्मा (वय 19, रा. बोरीवली पूर्व, मुंबई) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. तर सोहन पेटाडे असे जखमी तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन विश्वकर्मा हा दुचाकीवरून (एमएच 47/बीई 1158) मुंबईकडून पुण्याच्या दिशेने येत होता. तळेगाव दाभाडे येथे एबीसी पंपाजवळ महामार्गावरून मंत्रा सिटीकडे जाण्यासाठी एक पिकप वळण घेत असताना अर्जुन याने त्याच्या दुचाकीने पिकपला जोरात धडक दिली. त्यात अर्जुन हा गंभीर जखमी होऊन मयत झाला.

Pimpri : पिंपरीमध्ये मराठा आंदोलन कार्यकर्त्यांची धरपकड; कार्यकर्त्यांकडून ‘अंबादास दानवे गो बॅक’च्या घोषणा

तर त्याच्या दुचाकीवरील सोहन पेटाडे हा गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात दुचाकी आणि पिकपचे मोठे नुकसान झाले (Talegaon Dabhade ) आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.