Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी

'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणा; छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दिली मानवंदना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात शिवजयंतीनिमित्त रॅलीसह विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. वै. ह.भ.प.पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये ‘शिवजयंती निमित्त’ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक “श्री छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.

पिंपळे सौदागर येथील शिवार गार्डन ते पी. के. स्कूल अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे उदघाटन शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विकास काटे व नारायण काटे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका दीपाली जुगुळकर, पर्यवेक्षिका संगीता पराळे, सविता आंबेकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते.

  • शाळेतील विद्यार्थ्यांनी ढोल-ताशाच्या गजरात व लेझीम खेळत मिरवणुकीत सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. विद्यार्थ्यानी शिवाजी महाराज , राजमाता जिजाबाई , मावळे, आदी वेशभूषा केल्या होत्या . कार्यक्रम संपन्न झाल्यावर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.

मधुकर बच्चे युवा मंचच्या वतीने केशवनगर चिंचवड येथे तिथीप्रमाणे राजा छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. प्रभागातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचे जय घोषात मनोभावे पूजन करण्यात आले.

  • यावेळी अनेक मान्यवरांनी महाराजांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. अभ्यासक गोविंद देशपांडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंजाबराव मोंढे, डॉ,अभिजित भालचंद्र यांनी महाराजांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. शिवजयंती आयोजक महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य:मधुकर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. भाजपा रोजगार आघाडी पुणे जिल्हयाचे अध्यक्ष सौरभ शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले

नुकतेच काश्मिर येथे अतिरेकी भ्याड हल्ल्यात शहिद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी केमिस्ट असोशिएशन पिंपरी चिंचवड अध्यक्ष संतोष खिवंसरा, अशोक शिंगाडे, पंजाबराव मोंढे, सिने अभिनेते जयंत जोशी, सौरभ शिंदे, राजेंद्र भागवत, बाळासाहेब सुबंध, पोपट बच्चे, गोविंद देशपांडे, आयर अंकल, आर्षद शेख, गणेश बच्चे, सिद्धू लोणी,अभिजित पवार,दिवाकर खोले, हरीचंद्र कुलकर्णी,दशरथ काका,बरीदे आर,आदी नागरिक उपस्थित होते.

  • रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार ह्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, मुख्याध्यापिका श्राबनी पत्रानाभिश, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत कांबळे, आनंद शिंदे, संतोष लोलगे उपस्थित होते.

शिक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक पैलूवर शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रज्ञा, शील, करुणा चैतन्य, शूरत्व, स्वाभिमान, संयम, समयसूचकता अशा निपूण केले. शिवरायांचे चारित्र्य स्वच्छ आणि तेजस्वी होते. त्यामुळेच राजांबद्दल शत्रूना व त्यांच्या स्त्रियांना देखील आदर वाटायचा. सध्या शेकडो शेतक-यांच्या आत्महत्या होत आहेत. छत्रपतींचे स्वराज्य म्हणजे जगातील पहिले लोकशाही राज्य होय. राजा व त्यांचे मंत्रिमंडळ हे रयतेचे सेवक आहेत. हे जगात प्रथम शिवरायांनी मांडले व अमलात आणले. त्यामुळेच रयतेच्या भाजीच्या देठाला व गवताच्या काडीला हि इजा पोहचविणाऱ्या राज्यसेवाकास सजा होत असे. जगातील प्रत्येक प्रश्नांचे उत्तर शिवचरीत्रात सापडतात. म्हणून ‘शिवचरित्र’ हे वर्तमानात सर्वासाठीच प्रेरणादायी आहे. शिप्रा हाजेला यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

  • वाकड, थेरगाव येथील खिंवसरा पाटील शिक्षण संकुलमधील बालवाडी ते दहावी पर्यंतचे सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी शिवजयंतीनिमित्त संपूर्ण गणेशनगर परिसरात भव्य शोभायात्रा काढली. या शोभायात्रेत शहाजीराजे भोसले यांच्यापासून ते शाहू महाराजांपर्यंतचे सर्व नातेवाईक म्हणजे शहाजी राजे, जिजाऊ, शिवाजी महाराज, त्यांच्या आठ पत्नी, संभाजी महाराज, येसूबाई, भवानी बाळ राजाराम राजे, त्यांची पत्नी ताराबाई, शिवरायांच्या मुली, जावई, शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील सर्व मंत्री, धाराऊ, लाडी, हिरकणी, मल्लमा देसाई, गोंधळी, कवी कलश, बाजीप्रभू देशपांडे, लखुजीराव जाधव, मालोजीराजे भोसले, दादोजी कोंडदेव, हिरोजी फर्जद, तानाजी मालुसरे, जिवा महाला, मुरारबाजी इत्यादी सर्व सेनापती यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी तसेच लेझीम पथक, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी या शोभायात्रेत सामील झाले होते. लेझीमचे खेळ करत, शिवरायांचा पोवाडा म्हणत, तसेच शिवरायांचा जयजयकार करत ढोल-ताशांच्या गजरात ही शोभायात्रा संपूर्ण गणेशनगर मधून काढण्यात आली.

इयत्ता सहावीची विद्यार्थिनी संचिता काशिंदे हिने “पुण्य पवित्रभूमीचा, आहे निखारा क्रांतीचा” हे गीत गायले. अर्णव जगदाळे व अक्षदा मंडलिक या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावरचा पाळणा गायला. तसेच इयत्ता नववीची अंजली कांबळे हिने “आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त” ही कविता सादर केली. इयत्ता चौथीचा सार्थक वाल्हेकर याने महाराजांची किर्ती सांगणारा पोवाडा गाऊन सर्व श्रोत्यांच्या मनात शिवचैतन्य जागृत केले. शाळेत आलेले प्रमुख पाहुणे गीतकार अशोक नाना गायकवाड व किरण गायकवाड यांनी “आम्ही शिवाचे शूर शिपाई, भवानी आमची आई” हे शिवरायांच्या जीवनावरील गीत गाऊन सर्व श्रोत्यांची मने जिंकली.

  • लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालयाच्या विभाग प्रमुख अश्विनी बाविस्कर यांनी कायद्यानेच व शिस्तीनेच राज्य चालते, किल्लेदाराने खुद्द राजालाच नियम कसा दाखवून दिला हे सांगणारी गोष्ट सांगून शिवरायांच्या गुणांचे वर्णन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर हांडे, प्रास्ताविक मंजुषा गोडसे, परिचय कृतिका कोराम यांनी केले व मान्यवरांचे आभार प्रदर्शन खिंवसरा पाटील विद्यामंदिर चे मुख्याध्यापक नटराज जगताप यांनी मानले.

यावेळी बालवाडीच्या विभाग प्रमुख आशा हुले, पुष्पा जाधव, दिपाली नाईक, वनिता बकरे, सीमा आखाडे, छाया सुरवसे, संदीप बरकडे, अंजली सुमंत, वनिता जोरी, सुनिता घोडे इत्यादी सर्व शिक्षक व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. अरविंद एज्युकेशन सोसायटीत शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी

  • जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल आणि भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात शिवजयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका हर्षा बाठिया, गीता येरुणकर, तेजल कोळसे पाटील, मधु दाणी, रिंकू शिंगवी, प्रिया मेनन, श्रद्धा देशमुख, नीलिमा नायडू आदींसह शिक्षकवृंद, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरती राव यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कसे घडले? त्यांचे कार्य यांचे महत्त्व आणि जीवनकार्य उलगडून सांगितले. हर्षा बाठिया यांनी शिवाजी महाराजांच्या विचारांचे पालन करणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या राजदरबारातील अष्टप्रधान मंडळाचे सादरीकरण केले.

  • अष्टप्रधान मंडळाच्या कार्यशैलीवर विद्यार्थ्यांनी या माध्यमातून प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी पोवाडे गायले, तसेच पाळणाही म्हटला. मुख्याध्यापिका गीता येरुणकर, विशाखा भगत, मनिषा पुराणिक, आशा घोरपडे यांनीही विद्यार्थ्यांना शिवजयंती साजरी तर कराच, पण त्यांनी केलेले कार्य अमलातही आणावे, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी ‘राजे पुन्हा जन्माला या’, हे नाटक; तसेच पोवाडा, शिवजन्मोत्सव आदी कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक नीता भिसे यांनी; तर सूत्रसंचालन स्मिता बर्गे, धारा राजपुरोहित, अनिशा धारगावे यांनी केले.

निगडी येथील नवमहाराष्ट्र मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत पुलवामा येथे घडलेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला. निगडीतील भक्ती शक्ती समुह शिल्प येथे “हायटेक शिवसृष्टी” उभारण्याच्या मागणीला यश आल्यामुळे भाजप निगडी अध्यक्ष किशोर हातागळे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

  • शहरात सगळीकडे आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असुन छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास तळागाळातील सर्वांना माहिती व्हावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली तसेच पुलवामा येथे घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत पाकिस्तानमध्ये घुसुन आतंकवादी मारण्यासाठी सरकारने कडक पावले उचलावी, “महाराजांनी ज्या प्रकारे शत्रुला पळताभुई करत अनेक गडकिल्ले जिंकुन स्वराज्य स्थापन केले, सर्वसामान्य प्रजेला घेऊन सुराज्य प्रस्तापित केले त्याच पध्दतीने आपणही आदर्श घेतला पाहिजे” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे शिवाजी साळवे, भाजप निगडी अध्यक्ष किशोर हातागळे, मंडळाचे अध्यक्ष अरुण जोगदंड, सामाजिक कार्यकर्ते सुर्यकांत गायकवाड, सोमाजी बोडके, विलास बुचुडे, लहू नाटेकर यांच्यासह अनेक शिवप्रेमी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

  • संत तुकारामनगर येथे संत रोहिदास महाराज मंचाच्या वतीने संत रोहिदास महाराज यांची 642 वी तर शिवाजी महाराज यांची जयंती भजन,किर्तनाने साजरी करण्यात आली. यावेळी आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या हस्ते पूजा केली. छत्रपती शिवाजी महाराज शुर, बुद्धीमान, मुत्सद्दी, लोककल्याणकारी, नीतीमान राजे होते. ते केवळ आपल्या महाराष्ट्रचे नव्हते तर सर्व भारतीयांचे, जगभरातील लोकांचे प्रेरणास्थान होते. जसा भाऊ, बहीणीशी वागतो किंवा मुलगा आईशी वागतो तसे शिवाजी महाराज स्त्रियांशी वागत असे, मत मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आन्ना जोगदंड यांनी आपले मत व्यक्त करतांना केले.

अशा थोर महाराजांची जयंती व संत रोहिदास महाराज यांची वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरी केल्याने मला समाधान वाटले, असे नगरसेविका सुलक्षणा ताई शिलवंत यांनी सांगितले. सिद्ध कला भजनी मंडळ, शिवशक्ती भजनी मंडळ, मुक्ताई भजनी मंडळ, बहीणाबाई, कलावती, दत्त, गणेश, संत तुकारामनगर भजनी मंडळ इत्यादी भजनी मंडळांनी सहभागी झाले होते.

  • किर्तनातून समाज प्रबोधन केले .किर्तनानंतर सर्व भक्तांना महाप्रसाद देण्यात आला. संत रोहिदास मंच गेल्या 28 वर्षांपासून सामाजिक, धार्मिक कार्यक्रम आयोजित करत आहे. या मंचाने शिवजयंती व संत रोहिदास याची एकत्र जयंती साजरी करून समाज एकसंध ठेवण्याचे काम केले. त्याचबरोबर सर्व समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 11 सामाजिक कार्यकर्त्याना विविध क्षेत्रातील पुरस्कार आ. गौतम चाबुकस्वार, ज्ञानेश्वर कांबळे, बाबा कांबळे, अण्णा जोगदंड, प्रकाश रोकडे, यांच्या हस्ते देऊन त्यांना गौरविण्यात आले.

या संत रोहिदास मंचाचे बाबा कांबळे यांनी भरभरून कौतुक केले. त्यांना पुढील सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी मंचाचे अध्यक्ष सुनिल रोकडे, यावेळी मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड, नगरसेविका सुजाता पलांडे, सुलोचना शिलवंत, उपाध्यक्ष विकास शहाणे, अरुण बो-हाडे, तानाजी खाडे, फजलभाई शेख, महमदभाई पानसरे, आदर्श निंबोळकर आदी उपस्थित होते.

  • कार्यक्रमाचे संयोजन आभिमान साबळे, सागर भोसले, सुभाष पळशीकर, सुनिल गायकवाड, विजय गेजगे, पंडीत वनस्कर सचिन लाड आदींनी परिश्रम घेतले. शिवतेज क्रिडा व शिक्षण मंडळ संचलित तापकीर शाळेच्या वतीने काळेवाडी येथील तापकीर चौक येथे सालाबाद प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

स्विकृत नगरसेवक गोपाळ माळेकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवजन्म ते शिवराज्याभिषेक पर्यंतचा प्रवास गाण्यांच्या माध्यमातून साकारला. प्रितम शेळके, श्रेयश कागदे या विद्यार्थ्याने शिवाजी महाराजांची भूमिका साकारली.

तसेच शुभम बाळू पन्हाळे,रितेश चौधरी,अस्मिता अवचार, विनायानी लोहार, पायल कांबळे या विद्यार्थ्यांनी पोवाडे सादर करून स्फूर्तीदायी वातावरण तयार केले. भूषण कुमार धुपे, अथर्व इप्परकर, प्रगती जाधवया विद्यार्थ्यांनी भाषणे करून छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरक इतिहास मांडून उपस्थितांची वाहवा मिळविली. ओंकार जाधव आणि सहकारी यांनी खड्या आवाजात शिवाजी महाराजाची आरती सादर केली.

  • यावेळी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, छावा युवा मराठा महासंघचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील,नाना फुगे, तिरोडा विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख युवराज दाखले, पिंपरी चिंचवड पत्रकार संघटनेचे अध्यक्ष गणेश हुंबे, स्वीकृत नगरसेवक देविदास पाटील, सुरेश पाटील, संस्थेचे सचिव मल्हारीशेठ तापकीर, संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्या अश्विनी तापकीर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर, पुणे केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष विवेक तापकीर, आदी मान्यवर व पालक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक विभागाच्या प्र.मुख्याध्यापिका जयश्री पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल भटकर यांनी केले. उपशिक्षिका उल्का जगदाळे यांनी आभार मानले. जम्मु काश्मीर पुलवामामध्ये आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

  • महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आज पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसद्वारे “शिवस्फुर्ती” दुचाकी रॅली काढून शिवरायांना अभिवादन करण्यात आले. “शिवरायांच्या कतृत्वाची प्रेरणाच युवकांना जीवनातील संकटावर मात करण्याची व अशक्याला शक्य करण्याची शिकवण देत कायम यश संपादन करण्याची स्फूर्ती दईल”, असे सांगत नरेंद्र बनसोडे यांनी शिवअभिवादनातून युवकांना शिवप्रेरणा व शिवस्फूर्ती मिळावी म्हणून या रॅलीचे आयोजन केल्याचे सांगितले.

पिंपरी चौकातून निघालेल्या या रॅलीने प्रथम एचए कंपनी जवळील शिवस्मारकास अभिवादन केले. तसेच पुष्पहार अर्पण करून सुरूवात केली. त्यानतंर पिंपरी गावातील शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन घोषणा देत उत्साहाने कार्यकर्ते लांडेवाडी चौकाकडे आले. येथे रायगडाच्या दरवाज्याच्या प्रतिकृती समोरील शिवरायांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले नतंर दापोडी येथील शिवस्मारकास पुष्पहार अर्पण करून रॅली ची सांगता करण्यात आली. १०० दुचाकीस्वार यामध्ये सहभागी झाले.

  • रॅलीचे नेतृत्व युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी केले. याप्रसंगी काँग्रेसचे पदाधिकारी विजय ओव्हाळ, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव भोसरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नासीर चौधरी, जिल्हा युवक सरचिटणीस विरेंद्र गायकवाड, करण गील, अनिकेत अरकडे, गौरव चौधरी, रोहीत तिकोणे, फारूक खान, अनिल सोनकांबळे,बाळासाहेब डावरगावे, सैज्जाद चौधरी, सौनू शेख, अदित्य खराडे, सोहेल शेख, राहूल पवार, शुभम शिंदे, पांडूरंग वीर आदि पदांधिका-यांसमवेत कार्यकर्ते सहभागी झाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे “शिवजयंती” निमित्त शहराध्यक्ष संजोग वाघेरे (पाटील) यांच्या हस्ते “श्री. छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले. शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील व सेवादल अध्यक्ष आनंदा यादव, महिला भोसरी विधानसभा अध्यक्षा मनिषा गटकळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच ॲड. गोरक्ष लोखंडे यांनी शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीच्या कालखंड उलघडून सांगितला व कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष विनोद कांबळे यांनी केले.

  • यावेळी माजी नगरसेवक महंम्मद पानसरे, मुख्य संघटक अरूण बोऱ्हाडे, खजिनदार संजय लंके, चिंचवड विधानसभा अध्यक्ष गणेश भोंडवे, उपाध्यक्ष तुकाराम बजबळकर, सरचिटणीस अमोल भोईटे, महिला कार्याध्यक्ष पुष्पा शेळके, उपाध्यक्षा वर्षा शेडगे, दिपाली देशमुख, ब्लॉक अध्यक्ष संजय औसरमल, चिटणीस महेश झपके, उपाध्यक्ष सचिन मोरे, बाळासाहेब पिल्लेवार, महिला उपाध्यक्षा आशा शिंदे, भाग्यश्री पवार, किरण ठोंबरे, बन्सी पारडे, सलीम सय्यद, शुक्रल्ला पठाण, सचिन सकाटे, प्रियांका सुतार, दिनेश पटेल, प्रमिला जगताप, सवर्णा सुर्यवंशी, सुर्यकांत पात्रे, सुनिल अडागळे आदी उपस्थित होते.

शिवजयंतीच्या निमित्ताने महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय या संस्थेच्या वतीने नेहरूनगर, पिंपरी येथील पदमश्री वसंतदादा पाटील माध्यमिक शाळा येथे 16 फेब्रुवारीला क्रांतिकारकांची माहिती असलेले सचित्र फ्लेक्स प्रदर्शन (क्रांतिगाथा प्रदर्शन)लावण्यात आले होते. अनेक क्रांतिकारकांनी आपला देश स्वतंत्र होण्यासाठी इंग्रजांशी लढा दिला व आपल्या प्राणांचे बलिदान दिले. अशा क्रांतिकारकांच्या त्यागाची व शौर्याची आठवण विद्यार्थ्यांना व्हावी व विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम व देशाभिमान जागृत होऊन वृद्धिंगत व्हावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे आयोजन महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय या संस्थेचे कार्यकर्ते विश्वनाथ अवघडे, सुभाष अंभोरे, शशिकला अवघडे यांनी केले. या उपक्रमासाठी वसंतदादा माध्यमिक शाळेचे संस्थापक माजी महापौर हनुमंत राव भोसले व शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता काळे यांनी मोलाचे सहकार्य केले.

  • या प्रदर्शनाचे लाभ शाळेतील 300 हुन अधिक विद्यार्थांनी घेतला. असाच क्रांती गाथा प्रदर्शनाचा उपक्रम महेश नगर पिंपरी येथील प्रथमेश हाय स्कुल या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 18 फेब्रुवारीला आयोजित केला होता. या शाळेतील 300 विद्यार्थ्यांनी या उपक्रमाची लाभ घेतला. प्रथमेश स्कुल च्या संस्थपिका सौ कल्पना पोतदार, मुख्याध्यापक तसेच शिक्षकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रदर्शन आवडले.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण समिती तर्फे शिवजयंती उत्सचाहात साजरी करण्यात आली. त्यावेळी तळेगाव मधील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली,नगरपालिकेत शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे व शिक्षण समिती सभापती कल्पना भोपळे यांच्या हस्ते करून रॅलीला प्रारंभ झाला…त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगाचे ,देखाव्यांच्या चित्ररथांचे आयोजन करण्यात आले होते.

  • यामध्ये सर्व नगरसेवक, नगरसेविका ,शिक्षक ,पालक ,विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भाग घेतला. त्यानंतर नथुभाऊ भेगडे शाळेच्या प्रांगणात त्याचा समारोप झाला त्यावेळी प्रमुख वक्ते किरण परळीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले एकूण 26 शाळांनी या रॅली मध्ये भाग घेतला ,सहभागी शाळांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रके देण्यात आली . या वर्षी 3 उत्कृष्ट देखाव्यांना पारितोषिके देण्यात आली

तळेगाव दाभाडे जिजामाता चौक येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते पार्थ पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संपुर्ण मावळ तालुक्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. यावेळी त्याचे स्वागत ढोलताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले.

  • यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश युवक उपाध्यक्ष संतोष भेगडे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले जिल्हा उपाध्यक्ष संतोष मुऱ्हे माजी नगराध्यक्ष सुरेश भाऊ चौधरी माजी नगराध्यक्ष राजेंद्र पोळ नगरसेवक अरुण माने नगरसेविका वैशाली दाभाडे मंगला भेगडे माजी नगराध्यक्षा माया भेगडे आशिष खांडगे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक संतोष भेगडे व अरुण माने यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.