Pimpri News: आर्य समाजाचे आर्यवीर दल उद्या पिंपरी चिंचवड शहरातून प्रभात फेरी काढणार

एमपीसी न्यूज: आर्य समाजाचे आर्यवीर दल उद्या पिंपरी चिंचवड शहरातून प्रभात फेरी काढणार आहेत.(Pimpri News) उद्या भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरातूनही प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. या प्रभात फेरीत आर्य समाजाचे सभासद, कार्यकर्ते व नागरिक सहभागी होणार आहेत.

Pavana Dam Lighting: पवना धरण तिरंग्याच्या रंगसंगतीत विद्युत रोषणाईने नटले

दत्ता सूर्यवंशी, अध्यक्ष आर्यवीर दल, पुणे जिल्हा यांनी सांगितले की, ही प्रभात फेरी उद्या सकाळी 6 वाजता आर्य समाज भवन पिंपरी येथून निघेल. या प्रभात फेरीत आर्य समाजाचे सभासद, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्याने सहभागी होणार आहेत.(Pimpri News) प्रभात फेरी पिंपरी गाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ थांबून त्यांना अभिवादन करेल. पुढे ती फेरी चिंचवडगावातील चाफेकर चौकात चाफेकर पुतळ्याजवळ थांबून त्यांना अभिवादन करेल. त्यानंतर चिंचवड येथील के एस बी चौकाजवळील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करेल. व त्यानंतर पुढे जाऊन पुणे-मुंबई महामार्गावरील फिनोलेक्स चौका जवळील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करेल.  ह्या प्रभात फेरीचा समारोप पिंपरी मधील आर्य  समाज येथे होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.