Pavana Dam Lighting: पवना धरण तिरंग्याच्या रंगसंगतीत विद्युत रोषणाईने नटले

एमपीसी न्यूज: भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पवना धरणाच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या तिरंग्या रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.(Pavana Dam Lighting) विसर्गाच्या दरवाजातील पाण्यातील विद्युत रोषणाईचा अप्रतिम देखावा पाहायला मिळत आहे.ही तिरंगा रंगातील विद्युत रोषणाई आज रात्री व उद्या दिवसभर असणार आहे.

Alandi News: आळंदी मध्ये श्रीज्ञानेश्वरदर्शन ग्रंथ प्रकाशन व लोकार्पण सोहळा पार

पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करत असलेल्या पवना धरणाच्या विसर्गाच्या दरवाजातील पाण्यातील विद्युत रोषणाईचा अप्रतिम देखावा पहायला मिळत आहे. या धरणातून सध्या 3500 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. रंगेबिरंगी अनोखा अंदाज पाहण्यासाठी  नागरिक या ठिकाणी मोठी गर्दी करत आहे. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेली दोन-तीन दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे.(Pavana Dam Lighting) त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या दरवाज्यातून पाणी नदी पात्रात सोडण्यात आले आहे.

या विद्युत रोषणाईचे खास वैशिष्ट्य म्हणजे आपल्या भारतीय झेंड्यामध्ये जे तीन रंग आहेत. तिचं रंगसंगती साधत ही रोषणाई करण्यात आली आहे. ही मनमोहक दृश्यचा परिसरातील नागरिक आनंद लुटत आहे. ही तिरंगा रंगातील विद्युत रोषणाई आज रात्री व उद्या दिवसभर असणार आहे असे समीर मोरे, सेक्शन इंजिनियर पवना धरण यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.