Pimpri-Chinchwad accidents: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमधील सर्वाधिक अपघात सायंकाळी 6 ते रात्री 12 या वेळेत

एमपीसी न्यूज: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये  जानेवारी ते जुलै 2022 या सात महिन्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी 80 अपघात घडले आहेत.(Pimpri-Chinchwad accidents) हे अपघात संध्याकाळी 6 ते रात्री 9 व रात्री 9 ते 12 या वेळेत घडले आहेत. तसेच सर्वाधिक 40 गंभीर अपघात संध्याकाळी 6 ते रात्री 9 दरम्यान घडलेत व त्यामध्ये 41 जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती पिंपरी-चिंचवड वाहतूक उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिली आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालाय हद्दीमध्ये या वर्षीच्या सात महिन्यांमध्ये जानेवारी ते जुलै 2022 मध्ये एकूण 474 अपघात घडले आहेत. त्यापैकी सर्वाधिक अपघात हे संध्याकाळी 6 ते रात्री 9 व रात्री 9 ते 12 वा चे दरम्यान प्रत्येकी 80 अपघात घडले आहेत.

या सात महिन्यात संध्याकाळी 6 ते रात्री 9 दरम्यान 80 अपघात घडलेत.(Pimpri-Chinchwad accidents) यापैकी 40 गंभीर अपघात होऊन त्यामध्ये 41 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 27 गंभीर अपघातात 41 जण गंभीर जखमी झाले. 6 किरकोळ अपघातात 7 जण जखमी झाले.

Sunil Shelke: पाणी योजनांच्या कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा – आमदार शेळके

या सात महिन्यात संध्याकाळी 9 ते रात्री 12 दरम्यान 80 अपघात घडलेत. यापैकी 26 गंभीर स्वरूपाचे अपघात घडले असून त्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला आहे. 41 गंभीर अपघातात 60 जण गंभीर जखमी झालेत. 8 किरकोळ अपघातात 11 जण किरकोळ जखमी झाले आहेत.

या सात महिन्यात दुपारी 3 ते संध्याकाळी 6 दरम्यान 68 अपघात घडले आहेत. यापैकी 20 गंभीर अपघात होऊन त्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे.(Pimpri-Chinchwad accidents) 36 गंभीर अपघातात 49 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर 9 किरकोळ अपघातात 12 जण जखमी झाले.

या सात महिन्यात दुपारी 12 ते 3 दरम्यान 56 अपघात घडलेत. यापैकी 18 फेटल अपघात होऊन त्यामध्ये 21 जणांचा मृत्यू झाला आहे. 27 गंभीर अपघातात 31 जण गंभीर जखमी झाले. 5 किरकोळ अपघातात 7 जण किरकोळ जखमी झाले.

या सात महिन्यात सकाळी 9 ते दुपारी 12 दरम्यान 55 अपघात घडलेत. यापैकी 20 फेटल अपघात होऊन त्यामध्ये 22 जणांचा मृत्यू झाला आहे.(Pimpri-Chinchwad accidents) 24 गंभीर अपघातात 30 जण गंभीर जखमी झाले. 9 किरकोळ अपघातात 10 जण किरकोळ जखमी झाले.

या सात महिन्यात सकाळी 6 ते 9 दरम्यान 57 अपघात घडलेत. यापैकी 13 फेटल अपघात होऊन त्यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे. 31 गंभीर अपघातात 36 जण गंभीर जखमी झाले. तर 9 किरकोळ अपघातात 9 जण किरकोळ जखमी झाले.

या सात महिन्यात मध्यरात्री 12 ते पहाटे 3 दरम्यान 41 अपघात घडलेत. यापैकी 9 फेटल अपघात होऊन त्यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. 18 गंभीर अपघातात 27 जण गंभीर जखमी झाले. 5 किरकोळ अपघातात 6 जण किरकोळ जखमी झाले.

या सात महिन्यात पहाटे 3 ते सकाळी 6 दरम्यान 37 अपघात घडलेत. यापैकी 17 फेटल अपघात होऊन त्यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला आहे.(Pimpri-Chinchwad accidents) 11 गंभीर अपघातात 20 जण गंभीर जखमी झाले. 8 किरकोळ अपघातात 8 जण किरकोळ जखमी झाले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.