Sunil Shelke: पाणी योजनांच्या कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा – आमदार शेळके

एमपीसी न्यूज  – आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी सोमवारी (दि.21) विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषद, कामशेत-खडकाळा आणि पाटण नळ पाणीपुरवठा योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत, यावरुन ठेकेदार आणि प्रशासनाचे धोरण यावर प्रश्न उपस्थित केला.

यावेळी आमदार शेळके म्हणाले की, तळेगाव दाभाडे शहरातील पाणी योजनेच्या कामास अनेक वर्षांपासून दिरंगाई होत असून ठेकेदार गांभीर्याने काम करीत नाही. तसेच कामशेत, पाटण या योजनांसह इतर अनेक योजनांची एकत्रितपणे निविदा प्रक्रिया राबविल्यामुळे या कामांसाठी ठेकेदार मिळालेले नाहीत. यामुळे फेरनिविदा काढण्यात आल्या, परंतु त्यास देखील प्रतिसाद मिळाला नाही.

Kiran Navgire: शेतात राबणारे हात आता क्रिकेटचे मैदान गाजवणार, किरण नवगिरेचा समावेश भारतीय क्रिकेट संघात करणार

या योजनांना विलंब होत असल्यामुळे कामशेत, पाटणसह, सदापूर, देवले, भाजे, बोरज, दुधीवरे, शिंदगाव, औंढे-औंढोली या संबंधित गावांमधील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. जर या योजना विभक्त करून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. तर ठेकेदार काम करण्यासाठी पुढे येऊ शकतात व या प्रलंबित योजनांच्या कामाला गती मिळू शकेल. तरी, आपण यावर काही निर्णय घेणार आहात का, अशी मागणी (Sunil Shelke) आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आमदार शेळके यांनी केली.

त्यावर उत्तर देताना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी, ‘सभागृहाची वेळ संपल्यानंतर दालनात प्रत्यक्ष भेटून आजच्या आज या विषयावर मार्ग काढू.’ असे सांगितले. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या पाणी योजनांची निविदा प्रक्रिया होऊन कामास गती मिळणार आहे. व या गावांमधील पाणी प्रश्न सुटणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.