Chinchwad News : जलदिंडी उपक्रमाला 12 वर्षे पूर्ण, ‘रिव्हर पोलीस’ उपक्रमाला सुरूवात

एमपीसी न्यूज – पवना नदीवर 19 व 20 डिंसेबर रोजी जलदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. जलदिंडीच्या माध्यमातून सास्थ्य, पर्यावरण, विज्ञान संस्कृती यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला जातो. जलदिंडी उपक्रमाला 12 वर्ष म्हणजे एक तप पूर्ण झाले, यानिमित्त रविवारी (दि.19) जलदिंडी प्रणिते डॉ. विश्वास येवले यांच्या ‘नावाडी’ या पुस्तकावर आधारीत संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी 10.30 वाजता हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमासाठी मावळ विभागातून विद्यमान सरपंच पुनम आल्हाट माळवंडी, धामणे गावचे सरपंच सोमेश गरा, सोमाटणे सरपंच स्वाती शेळके, वारु ब्राम्हणोली सरपंच शाहिदास निंबळे, सांगवडे सरपंच रोहन जगताप व योगेश चिंचवडे उपस्थित होते. तसेच, नोबल हॉस्पिटलचे संचालक डॉ. दिलीप माने, IICMR संचालक डॉ. अभय कुलकर्णी, नितीन कोतापल्ले, रुलर रिलेशन प्रदिप लोंखडे , निवृत आ.ए. एस. अधिकारी के.एन नागरगोजे, ग्राम प्रबोधिनीचे संचालक व्यंकटेश भताने आदी मान्यवर उपस्थित होते.

संगीत कार्यक्रमाचे सादरीकरण अभिवाचक – भूषण करंदीकर, गायक – अवधूत गांधी, अमिता घुगरी, हरिदास शिंदे, संगीत संयोजन – केदार दिवेकर, कीबोर्ड – अमृता केदार, तबला – पांडुरंग पवार, पखवाज – राजेश बघे, संवादिनी – अभय नलगे, ढोलकी – नागेश भोसेकर, टाळ व गायन साथ – विजय सोनवणे, प्रसाद भांडवलकर यांनी केले. जलदिंडी इंद्रायणी नदीवर केलेल्या प्रवासावर हा संगीत कार्यक्रम आधारीत आहे. हा संगितमय प्रवास लोकांना वेगळीच अनुभूती देऊन गेला.

यावेळी प्रवीण लडकत व ओंकार गौरीधर यांनी ‘पवनामाई निर्मळतेकडे’ या योजनेअंतर्गत ‘रिव्हर पोलीस’ ( River Police) या उपक्रमाची माहिती दिली. रिव्हर पोलीस उपक्रमाअंतर्गत पवना नदीतून चिंचवड घाट ते पवना धरण असा 32 कि. मि. प्रवास करत नदीत होणा-या प्रदुषणाचा व तसेच जिंवत नाले यांचा शोध घेत त्यांचा उगमस्थाना पर्यंत पोहचणे, जनजागृती करणे व सर्व अभ्यासाचा अहवाल जिल्हाधिकारी पालिका आयुक्त सी.ओ.व प्रदुषण महामंडळास सादर करण्यात येणार आहे.

कार्यक्रमात पुढे पवनामाई पुरस्कार 2021′ चे वितरण करण्यात आले. यामध्ये ‘पर्यावरण मित्र पुरस्कार 2021’ टाटा मोटर्सचे युनियन अध्यक्ष व अविरत श्रमदान व सायकल मित्र संस्थापक तसेच नदी स्वच्छता अभियाना अंतर्गत रिव्हर सायक्लोथॉनचे आयोजक सचिन भैयासाहेब लांडगे यांना प्रदान करण्यात आला. ‘जलमित्र पुरस्कार’ Wilo Mather platt चे MD व CEO माननीय हेंमत वाटवेजी यांना देण्यात आला.

तपपूर्ती सोहळ्यानिमित्त पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, त्यात प्रथम पारितोषिक ज्ञान प्रबोधिनी निगडी, द्वितीय पारितोषिक मॉडर्न महाविद्यालय व तृतीय पारितोषिक ग्रामप्रबोधिनी साळूंब्रे यांना देण्यात आले. यावेळी अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स पुणे 30, हिंदूस्थान अँटीबायोटीक स्कूल पिंपरी पुणे 18, साईक्रांती युवा प्रतिष्ठान, ग्रामपंचायत वडनेर खूर्द ता. शिरूर, पुणे , अशोक आनंदराव बांगर, उपशिक्षक, जि . प . प्राथ शाळा गुळंचवाडी ता. जुन्नर, पुणे या शाळांना वृक्षमित्र पुरस्कार देण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत भावसार यांनी केले. सुर्यकांत मुथीयान यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.