Chinchwad news: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला वेगळे सायबर पोलीस स्टेशन सुरू करावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला वेगळे सायबर पोलीस स्टेशन सुरू करावे असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.
आज दुपारी 1.30 चे सुमारास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यालयाला भेट दिली.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, “सायबर पोलीस स्टेशन सुरू करावे यशह सूचना दिल्या आहेत”
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मनुष्यबळाची व वाहनांची कमतरता आहे. याबाबत विचारले असता पाटील म्हणाले की, ” त्यासाठी दोनशे नवीन रिक्रुटमेंट होईल. राज्यासाठी आपण 20,000 नवीन भरती करीत आहोत. नवीन 200 भरतीची प्रक्रिया महिन्याभरात सुरू होईल. हळूहळू स्ट्रेन्गथ वाढत जाईल. पोलीस आयुक्तालय अद्यावत करण्यासाठी जे लागेल ते आम्ही देऊ. त्यांना जिल्हा नियोजन मधून निधी दिला जाईल. जिल्हा नियोजन साठी हजार कोटीचा निधी असतो. त्यात 100 कोटी हा अशा कामांसाठी असतो. सी एस आर फंड सुद्धा ही मोठी ताकद आहे. आपण कोळी संबंधी मेजॉरिटी कामे ही सीएसआर मधून केलेली आहेत. “
यावेळेस भोसरी आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, एकनाथ पवार माजी सत्तारूढ पक्ष नेता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे व इतर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.