National congress doctor Cell : राष्ट्रीय काँग्रेस डॉक्टर सेल च्या लढ्याला यश …

एमपीसी न्यूज : पुणे शहर काँग्रेस डॉक्टर सेल यांच्यावतीने पुण्यातील डॉक्टरांच्या मेळाव्याचे आयोजन नुकतेच केले होते. (National congress doctor Cell) त्यानंतर शहराध्यक्ष मा अरविंद शिंदे यांच्या बरोबर मनपा आयुक्त विक्रमकुमार यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन मागण्या मांडल्या होत्या.या बैठकीत सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची डॉ संभाजी करांडे यांच्या नेतृत्वात डॉक्टर सेल शिष्टमंडळाने भेट घेतली. यामध्ये डॉ रवींद्रकुमार काटकर, डॉ अण्णासाहेब गरड, डॉ राम मूळे हे होते. यावेळी शिष्टमंडळाने आपल्या विविध मागण्या मांडल्या. त्यावर तात्काळ मुंबई मध्ये मंत्रालयात सेक्रेटरी, सर्व प्रशासनातील अधिकारी वर्ग, पुणे शहर काँग्रेस कमिटी डॉक्टर सेल आणि डॉक्टरांच्या प्रश्नावर नेहमी कार्यरत असणारी आयएमए यांची एकत्र मीटिंग घेण्याचे आश्वासन दिले.

pimpri news: संस्कारची दिवाळी अतिदुर्गम जिमलगट्टा या भागातील आदीवासी बांधवांसोबत साजरी

त्याप्रमाणे काल मंत्रालयात डॉक्टर सेल आणि आयएमए यांचे शिष्टमंडळ ,प्रशासन यांच्या बरोबर काल मीटिंग पार पडली. अत्यंत सकारात्मक सखोल चर्चा झाली. या अनुषंगाने शासनाचा GR अधिनियम याचे सरक्यूलर त्या संबंधित स्थानिक संस्थांना लवकरच पाठवण्यात येईल असे आश्वासित करण्यात आले.(National congress doctor Cell) काँग्रेस डॉक्टर सेल पुणे अध्यक्ष डॉ संभाजी करांडे पाटील यांचे पुढाकारातून या सर्व मागण्यांचा पाठपुरावा करण्यात आला. .कालच्या मीटिंगसाठी डॉक्टर सेल तर्फे डॉ संभाजी मांगडे डॉ अण्णासाहेब गरड तर आईएमए तर्फे डॉ सुहास पिंगळे डॉ सुनील इंगळे डॉ नितीन भगली डॉ संजय पाटील हे उपस्थित होते. भविष्यात सुद्धा डॉक्टरांच्या प्रश्नावर्ती काँग्रेस डॉक्टर सेल आपली भूमिका नेहमीच प्रभावीपणे मांडत राहणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.