Chinchwad : राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त पिंपरी चिंचवड पोलिसांचे पथसंचालन

एमपीसी न्यूज – लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त पिंपरी चिंचवड पोलिसांनी आज (शनिवारी, दि. 31) पथसंचालन केले. देशभक्तीपर गीतांच्या संगीतावर हे पथसंचालन खंडोबा माळ चौक, आकुर्डी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी या मार्गावर करण्यात आले.

मुख्यालयाचे पोलीस निरीक्षक राजकुमार माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभर राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो. देशभरातील सर्व पोलीस आणि सुरक्षा दले यानिमित्त पथसंचालन करतात. पिंपरी चिंचवड पोलिसांनी देखील हे पथसंचालन केले.

यामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस दलाचे दोन आणि एसआरपीएफचे एक असे एकूण तीन प्लाटून आणि बँड पथकाने सहभाग घेतला. आकुर्डी येथील खंडोबा माळ चौकातून पथसंचालनाला दुपारी पाच वाजता सुरुवात झाली. परेडचे नेतृत्व पोलीस निरीक्षक राजकुमार माने यांनी केले. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत हे पथसंचालन करण्यात आले. सहा वाजता पथसंचालनाचा समारोप झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.