Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’मध्ये शेकडो गुन्हेगारांची झाडाझडती

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलिसांनी रविवारी (दि. 9) रात्री साडे दहा ते (Chinchwad) सोमवारी (दि. 10) पहाटे चार वाजताच्या कालावधीत ‘ऑल आऊट ऑपरेशन’ राबविले. कोंबिंग व नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी शेकडो गुन्हेगारांची झाडाझडती घेतली.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त विवेक पाटील, पोलीस उप आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहा पोलीस आयुक्त, सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व अमंलदार, सर्व गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी व अंमलदार असे एकूण 79 पोलीस अधिकारी, 422 पोलीस अमंलदार सहभागी झाले.

नाकाबंदी व कोंबिग ऑपरेशन दरम्यान एक हजार 878 संशयीत वाहने चेक केली. रेकॉर्डवरील 605 आरोपी चेक केले. मोटार व्हेईकल अॅक्ट प्रमाणे 183 वाहनांवर कारवाई करुन तीन लाख 26 हजार 800 रुपये दंड वसुल केला आहे. 103 हॉटेल लॉज चेक केले.

India News : झिंकच्या किमतीं २८ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर: एंजल वन

70 संशयीत इसम, 60 हिस्ट्रीसिटर चेक करत 57 पाहिजे आरोपी अटक केले. तीन फरारी आरोपी चेक (Chinchwad) केले आहेत. 15 संशयीत वाहने ताब्यात घेतली आहेत. 11 एन. बी. डब्ल्यु वॉरंट, 5 बी. डब्ल्यु वॉरंट बजावण्यात आले. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 33 प्रमाणे 7, आर्म अॅक्ट प्रमाणे दोन तर महाराष्ट्र दारुबंदी कायद्याअंतर्गत तीन कारवाया करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.