Pimpri: अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून पळवून नेल्याची तक्रार

Pimpri: Complaint of kidnapping of a minor girl पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी (दि.6) पिंपरी, भीमनगर येथे घडली.

याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने गुरूवारी (दि.16) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या सतरा वर्षीय मुलीला कोणी अज्ञात इसमाने अमिष दाखवून पिंपरीच्या भीमनगर येथून पळवून नेले आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.