Pimpri corona news: शहरातील कोरोना रुग्णांमध्ये पुरुषांचे प्रमाण 60 टक्के, तर महिलांचे प्रमाण 40 टक्के

74 हजार 971 युवक बाधित

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग पुरुषांना झाला आहे. 60 टक्के पुरुष तर 40 टक्के महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. पुरुषांमध्ये 22 ते 39 वयोगटातील युवकांचे सर्वाधिक प्रमाण आहे. या वयोगटातील तब्बल 43.63 टक्के म्हणजेच 74 हजार 971 युवकांना कोरोनाची बाधा झाली आहे.

शहरात 10 मार्च 2020 रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर फेब्रुवारी 2021 पासून शहरातील रुग्णसंख्येत पुन्हा झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाची लागण सर्वाधिक पुरुषांना झाली आहे.

महिलांच्या तुलनेत कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण पुरुषांचे जास्त आहे. शहरातील 60 टक्के पुरुषांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर, 40 टक्के महिलांना कोरोनाची लागण झाली आहे.

पुरुषांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक विळखा 22 ते 39 वयोगटातील युवकांना झाला आहे. आजपर्यंत या वयोगटातील 74 हजार 971 युवकांना बाधा झाली आहे. त्याचे प्रमाण 43.63 टक्के आहे. तर, त्याखालोखाल 40 ते 59 वयवर्ष असलेल्यांना लागण होण्याचे प्रमाण आहे.

_MPC_DIR_MPU_II

या वयोगटातील 51 हजार 539 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचे प्रमाण 29.99 टक्के आहे. त्यानंतर 60 ते 69 या वयोगटातील 13 हजार 215 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्याचे प्रमाण 7.69 टक्के आहे.

13 ते 21 वयवर्ष असलेल्या 11 हजार 57 तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्याचे प्रमाण 6.91 टक्के आहे. 0 ते 12 या वयोगटातील 11 हजार 578 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्याचे प्रमाण 6.74 टक्के आहे. याशिवाय 70 वर्षापुढील 8 हजार 667 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्याचे प्रमाण 5.04 टक्के आहे.

महापालिकेने दिलेल्या नकाशातील आकडेवारीनुसार 14 एप्रिल पर्यंतची ही टक्केवारीची माहिती आहे. दरम्यान, आजपर्यंत शहरातील कोरोना रुग्णसंख्या 1 लाख 86 हजार 25 वर जाऊन पोहोचली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.