Pimpri Corona Update : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी 2 हजार 471 जणांना डिस्चार्ज; 2 हजार 20 नवीन रुग्ण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 9) दिवसभरात 2 हजार 471 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 2 हजार 20 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 65 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 2 लाख 30 हजार 223 एवढी झाली आहे. तर आजवर 2 लाख 05 हजार 23 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

रविवारी 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 41 रुग्ण शहरातील तर 24 रुग्ण शहराच्या बाहेरील आहेत. आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 3 हजार 339 तर शहराच्या बाहेरील एक हजार 702 रुग्णांचा शहरातील रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

शहरात 21 हजार 861 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 14 हजार 907 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 6 हजार 954 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. शहरातील 142 रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 4 हजार 561 जणांचे चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी एक हजार 546 जणांना कोरोना प्रतिबंध लस देण्यात आली. आजवर शहरातील 4 लाख 30 हजार 138 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.