Pimpri corona Update : शहरात कोरोनाचे 797 सक्रिय रुग्ण; शनिवारी 180 नवीन रुग्णांची भर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात सध्या कोरोनाचे 797 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज (शनिवारी, दि. 12) शहरात 180 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर दिवसभरात 267 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 94 हजार 268 एवढी झाली आहे. तर आजवर 91 हजार 32 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शनिवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यातील एक आंबेगाव (80 वर्ष), तर दुसरा तळेगाव ढमढेरे (78 वर्ष) येथील आहे.

आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 1 हजार 716 तर शहराच्या बाहेरील 695 रुग्णांचा शहरातील रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

शहरात 797 रुग्ण सक्रिय आहेत. त्यांच्यावर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर 723 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शहरातील 82 रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 1 हजार 64 जणांचे चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.