Pimpri Corona Update: जाणून घ्या तुमच्या भागातील सक्रिय रुग्णांची संख्या

Pimpri Corona Update- Find out how many active patients are in your area and how many have recovered

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवडमध्येही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. परंतु, दिलासादायक बाब म्हणजे सक्रिय रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या मोठी आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारपर्यंत (दि. 6) कोरोनाने 700 चा आकडा पार केला असला तरी सक्रिय रुग्णांची संख्या 273 इतकी होती. आतापर्यंत 438 रुग्ण यातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

भागनिहाय रुग्णांची संख्या, बरे झालेले रुग्ण आणि मृतांची संख्या

ताथवडे- एकूण रुग्ण 3. 2 रुग्ण पूर्णपणे बरे, एकावर उपचार सुरु

पुनावळे- एकूण 5 रुग्ण. 5 ही रुग्ण बरे

किवळे- एकूण 17 रुग्ण. 10 रुग्ण बरे, 7 जणांवर उपचार सुरु

रावेत- 1 रुग्ण होता. तोही पूर्णपणे बरा झाला आहे.

वाल्हेकरवाडी- एकूण 3 रुग्ण, 2 रुग्ण बरे, एकाचा मृत्यू

चिंचवड- एकूण 250 रुग्ण. 165 रुग्ण ठणठणीत. 85 जणांवर उपचार सुरु

पिंपरी- एकूण 77 रुग्ण. 37 झाले बरे. 40 जणांवर उपचार सुरु

भोसरी- एकूण 56 रुग्ण. 34 रुग्ण झाले बरे. 19 जणांवर उपचार सुरु. तिघांचा मृत्यू.

मोशी- एकूण 15 रुग्ण. 18 जण झाले बरे.

चऱ्होली- एकूण 18 रुग्ण. 14 पूर्णपणे ठणठणीत. 4 जणांवर उपचार सुरु.

दिघी- एकूण 9 रुग्ण. 8 झाले बरे. एकावर उपचार सुरु.

बोपखेल- एकूण 1 रुग्ण. त्या रुग्णावर उपचार सुरु

दापोडी- एकूण 22 रुग्ण. 5 जण झाले बरे. 14 जणांवर उपचार सुरु तर तिघांचा मृत्यू.

पिंपळे सौदागर- एकूण 9 रुग्ण. 9 रुग्ण ठणठणीत. तिघांवर उपचार सुरु

काळेवाडी- एकूण 7 रुग्ण. 3 ठणठणीत बरे. 4 जणांवर उपचार सुरु

रहाटणी- एकूण 5 रुग्ण. 4 जण झाले बरे. एकावर उपचार सुरु

वाकड- एकूण 35 रुग्ण. 18 रुग्ण झाले बरे. 17 जणांवर उपचार सुरु.

थेरगाव- एकूण 11 रुग्ण. 9 जण पूर्णपणे झाले बरे. एकावर उपचार सुरु तर एकाचा झाला मृत्यू.

महात्मा फुले नगर- एकूण 2 रुग्ण. दोन्ही रुग्णांवर उपचार सुरु.

खराळवाडी- एकूण रुग्ण 14. 11 रुग्ण झाले बरे. दोघांवर उपचार सुरु तर एकाचा मृत्यू.

चिखली- एकूण 9 रुग्ण. 5 जण झाले बरे. 4 जणांवर उपचार सुरु.

ताम्हणेवस्ती- एकूण 3 रुग्ण. तिघेही झाले बरे.

कासारवाडी- एकूण 6 रुग्ण. 4 झाले बरे तर दोघांवर उपचार सुरु.

आकुर्डी- एकूण 28 रुग्ण. 28 जणांवर उपचार सुरु.

निगडी- एकूण 2 रुग्ण. एक रुग्ण ठणठणीत तर एकावर उपचार सुरु.

संभाजीनगर- एकूण 7 रुग्ण. सातही रुग्ण ठणठणीत.

मोहन नगर- एकूण 1 रुग्ण. तोही रुग्ण ठणठणीत.

रुपीनगर- एकूण रुग्ण 44. 38 जण झाले बरे. चौघांवर उपचार सुरु तर दोघांचा मृत्यू

तळवडे- एकूण 5 रुग्ण. पाचही रुग्ण झाले बरे.

नेहरुनगर- एकूण 4 रुग्ण. एक रुग्ण बरा तर तिघांवर उपचार सुरु.
नवीन सांगवी- एकूण 5 रुग्ण. एक रुग्ण ठणठणीत तर 4 जणांवर उपचार सुरु.

जुनी सांगवी- एकूण 26 रुग्ण. 9 जण ठणठणीत. 16 जणांवर उपचार सुरु. एकाचा मृत्यू.

फुगेवाडी- एकूण 2 रुग्ण. एक रुग्ण ठणठणीत तर एकावर उपचार सुरु.

पिंपळे गुरव- एकूण 15 रुग्ण. 7 जण झाले बरे. 8 जणांवर उपचार सुरु.

पिंपरी वाघेरे- एकूण 5 रुग्ण. पाचही जणांवर उपचार सुरु.

पिंपळे निलख- एकूण 1 रुग्ण. तोही रुग्ण ठणठणीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.